Skip to main content

Corona Series Part 84 : कोरोनामुक्त न्यूझीलँड

Corona Series Part 84

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/

 

कोरोनामुक्त न्यूझीलँड

जगभरात सर्व देशांमध्ये कोरोनाचा धोका एकाच वेळी होता. परंतु काही देश या संकटावर लवकर मात करू शकले सध्या काही ठिकाणी हा लढा अजूनही सुरू आहे एक दिवस ते सुद्धा कोरोनावर विजय मिळवतील आणि म्हणूनच विजय मिळवलेल्या देशांची विजयगाथा बगितली तर आपल्याला देखील काही गोष्टीचे ज्ञान मिळते आणि आपले मनोबल वाढते आज ५० लाख लोकसंख्या असणारा न्यूझीलँडची कहाणी पाहू.

भारत आणि न्यूझीलँडया दोन्हीही देशांनी एकाच दिवशी २५ मार्च २० रोजी आपला देश लॉकडाउन केला आणि ८ जुन रोजी न्यूझीलँड कोरोनामुक्त झाला. भारतामध्ये एका मोठ्या शहराची लोकसंख्या न्यूझीलँड पेक्षा अधिक असली तरीही भारतातील मोठ्या शहर, गाव कोरोनामुक्त होणे गरजेचे होते अर्थात काही ठिकाणी घडत आहे. परंतु न्यूझीलँड हा पर्यटनाचा देश आहे भारता पेक्षा आधिक पर्यटक न्यूझीलँड मध्ये येत असतता त्यामुळे तुलनेने धोका आधिक होतो.  

यशाचे श्रेय घेण्यासाठी बरेच असतता परंतु अपयशाचा धनी कोणीही नसतो असे म्हंटले जात असले तरीही न्यूझीलँडच्या पंतप्रधान मा. जेसिंडा अर्डेन ह्या मात्र कोरोनामुक्तिचे श्रेय team of 50 Million यांना देऊ केले. सर्व नागरिकानी देशाचे नेतृत्व जे सांगेल ते मान्य करून त्याची तंतोतंत सूचनाची अंमलबजावणी केली. भारता प्रमाणेच 4 टप्प्याचा लॉकडाउन न्यूझीलँडमध्ये देखील होता. जागता सर्वच ठिकाणी कोरोनाशी लढण्यासाठी एकच प्रकार वापरलं परंतु त्याची अंमलबजावणी मात्र वेलग्वेगली होती. २५ मार्च रोजी पहिल्या टप्प्या मध्ये अंतरराष्ट्रीय सीमा बंद करण्यात आल्या सर्व काही थांबव्न्यात आले होते. जैसे थे परिस्थिति होती. कोरोनाचा  सामाजिक प्रसार होण्याचा संभव होता. पंतप्रधान कार्यालयातून stay in your bubble या टॅग लाइनचे नागरिकांनी तंतोतंत पालन केले. पहिला टप्पा २६ एप्रिल प्रयत्न अंमलात आणला. २७ एप्रिल पासून दुसर्‍या टप्पा जो Restrating phaseचा होता. कोरोनाचा विषाणूला अडथळा आणा. सामाजिक आयुष्य विचार करून जगायची वेळ होती. कडक नियमपाळत शाळा सुरू करण्यात आली प्रत्येक विद्यार्था मध्ये २ मीटरचे अंतर राखणे, सामाजिक अंतर राखणे असे नियम पाळले गेले आणि काही व्यवसाय देखील चालू केले गेले. Redused phase १३मे रोजी ३र्‍या टप्प्यामध्ये चाचणीचे प्रमाण अधिक वाढवून त्याच बरोबर व्यवसायामध्ये अधिकची सूट दिली. सर्वात महत्वाचे म्हणजे या टप्प्यामध्ये आरोग्य खात्याने भरपूर काम केले. कोरोनाचे रुग्ण शोधून काढणायत आले आणि योग्य औषध उपचार केले. १०० पेखा अधिक लोकांचे एकत्रिकरन करण्यास मनाई करण्यात आली.  न्यूझीलँडच्या ४थ्या टप्प्या ८ जूनला जाहीर झाला तेव्हा मागील १७ दिवस एकही रुग्ण संपूर्ण न्यूझीलँड मिळाला नाही आज रोजी सीमा बंद असून बाकी सर्व व्यवहार पूर्वव्रत करण्यात आले. भारतामध्ये देखील अशी वेळ येणार आहे परंतु लोकसंख्या अधिक असल्यामुळे आणि तांत्रिक, वैद्यकीय गोष्टी मध्ये सुधारणा केल्यास लवकरात लवकर भारत देखील कोरोना मुक्तिकडे जाईल. पण देश कोरोनामुक्त करायचा असेल तर नागरिकानी आपली जबाबदारी आपले कर्तव्य आहे असे समजून वागने गरजेचे आहे.

 

प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे,

रसायनशास्त्र विभाग

विवेकानंद कॉलेज कोल्हापूर


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Corona Series Part 39 : कोरोना, आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग

Corona Series Part 39       नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोना , आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग जगात असा एक ही देश नसेल जिथे ज्ञानाचा भंडार असणारे भारतीय लोक त्या देशाच्या प्रगतिमध्ये सहभागी नाहीत. कोरोनाच्या लढ्यात तरी हे मागे कशी राहतील. सिरम इंडिया लिमिटेड पुणे स्थित जैव तंत्रज्ञानातील अग्रणी कंपनी आहे यां कंपनीचे वैशिष्ट्य म्हणजे या पूर्वी ही hepatitis, पोलीओ , स्वाइन फ्लू इत्यादि आजारामध्ये लस निर्माण करण्याचे महत्वाचे योगदान आहे. वर्षभरात १.५ अब्ज लसीचे डोस अतिशय माफक दरात तयार करण्याची क्षमता असणारी या कंपनीचे उत्पादन यूरोपियन देशात व संशोधन यूनिट पुणे सारख्या शहरात आहे. भारतामध्ये एक ही नोबेल परितोषिक किवा औषधाचा स्वामित्व हक्क नाही तरीही औषध , लस उत्पादन करण्यात प्रावीण्य , विश्वसनीय नावलौकिक मिळवणारा देश आहे. जावपास ८०% लस आफ्रिका सारख्या देशात पुरवेल जातात. कोरोनाची लस निर्माण करण्यासाठी न्यूयॉर्क मधील codagenic या...

Corona Series Part 56 : कोरोना, आणि ई-शिक्षण

Corona Series Part 56 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. आजचा विषय विस्तृत मांडला आहे.   या विषया बाबतीत आपण आपले मत ब्लॉगवर जरूर कळवावे ही विनंती.     https://ajinkya1030.blogspot.com   कोरोना , आणि ई-शिक्षण मार्च महिन्यापासन कोरोनाचा प्रभाव दिसू लागला शेवटच्या आठवड्यापासून शाळा , कॉलेज लॉकडाउनच्या काळापासून आज पर्यन्त बंद करण्यात आल्या. भितीदायक वातावरणामध्ये १० , १२वी च्या परीक्षा घेण्यात आल्या. शैक्षणिक वर्ष २०१९-२० चे कार्य संपत आले होते परंतु लेखी आणि मौखिक परीक्षा राहिल्या होत्या . आणि आता यूजीसीच्या मार्गदर्शंनानुसार त्या राहूनच जातील. किंवा काही अंशी तात्पुरती योजना राबवून काही ना काही मार्ग काडला जाईल.   नैसर्गिक आपत्ती महापुर , वैश्विक महामारी मधून शैक्षणिक क्षेत्रा समोर नवीन आव्हान उभे राहिले आहे. खाजगी , काही सरकारी शाळा , कॉलेजने देखील तात्पुरती सोय करण्यासाठी ऑनलाइन तास झूम , गूगल क्लासरूम , गूगल डॉक , यू ट्यूब , व्हाट्स अप...

पुन्हा कधीही कोरोना सारख्या महामारीमुळे लेख लिहायची वेळ येऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे आज काय लिहावे आणि काय नको समजेनासे झाले आहे. तरी धाडस करून लिहित आहे. काही चुकले तर समजून घ्यावे ही विनंती.   मार्च महिन्यामध्ये जगात नवीन विषाणू ने धुमाकूळ घातला होता सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शास्त्रज्ञ , संशोधक , मीडिया , नेते , उद्योजक , आणि सामान्य जनता सर्वच नागरिकांना पुढे काय वाहून ठेवले आहे याची कल्पना नव्हती. परिस्थितीचे आकलन होण्याचा आतच लॉकडाउन झाला तेव्हा सुट्टीचा आनंद घेऊया असे समजून काही नागरिक मस्त मजेत होते. हळू हळू परिस्थिती बदलून गंभीर झाली , पण नेमके काय चालू आहे काय करावे आणि काय करू नये याचा अंदाज लागेना. मीडिया मध्ये रोज के भीतीदायक बातमी येऊ लागली कधी विषाणू वर असलेले उपाया येऊ लागले पण शास्त्रीय माहिती सजत नसल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ लागले . अश्या मध्ये रसायनशास्त्राचा विद्यार्थी म्हणून कोरोना विषाणूच्या विरोधात   काही काम करावे असे वाटत होते परंतु संशोधन करण्यासाठी काही मर्यादा होत्या याचे भान होते पण शांत बसून चालणार नाही हे लक्षात आले होते. म्हणून मनातून ठरवले आज या संकटकाळी समजासाठी आप...