Skip to main content

Corona Series Part 80 : कोरोना, आणि बेकायदेशीर ड्रग्स तस्करी

Corona Series Part 80

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/

 

कोरोना, आणि बेकायदेशीर ड्रग्स तस्करी

संयुक्त राष्ट्राच्या मदतीने यूनायटेड नेशन ऑफिस ऑन ड्रग्स अँड क्राइम (यूऐनओडीसी) यांच्या मार्फत माहीत प्रसिद्ध करण्यात आली. १९९७ साली स्थापन झालेली ही संस्था ड्रग्स आणि ड्रग्सबाबतीतील होणारे गुन्हे यांची दाखल घेते. प्रतीवर्षी एक अहवाल प्रसिद्ध करण्यात येतो सध्या कोरोनामुळे सारे जग लॉकडाउन असले तरी स्थानिक पातळीवर दारू, गुटका आणि राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय स्तरावर ड्रग्सची तस्करी मात्र सुरूच आहे पुढील १००वर्षामध्ये सरकारी दारू दुकान सारखे सरकारी ड्रग्स चे दुकान दिसते की काय असे वाटते. किंबहुना महाराष्ट्रामध्ये तर दारू पिणारे आणि विकणारे अर्थव्यवस्थेचा कणा होऊन गेले आहेत.

Syntetic Drugs in East and South Asia या अहवालामध्ये कोरणाच्या काळातही ड्रग्सची वाहतूक थांबली नसल्याचे आढळून आले. भारतामध्ये पहिल्या लॉकडाउनच्या काळात ड्रग्सची वाहतूक थोडी मंदावली होती परंतु एकदा संपूर्ण यंत्रणेचा लक्ष कोरोनावर केन्द्रित आहे हे लक्षात आल्यावर पुन्हा नव्या जोमाने तरुणाई डब घाईला नेण्याचे जोरदार प्रयत्न सुरू झाले. सरकारी यंत्रणेने या मध्ये जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. ड्रग्स जप्तीच्या बाबतीत किवा ड्रग्स किंवा त्यापासून होणारे मृत्यू यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सबंध या अवैध ड्रग्स तस्करी बरोबर आहे म्हणून पोलिस यंत्रणेनेण याची गय करून चालणार नाही. लॉकडाउनच्या काळात ही कार्यरत असणारे संघटनावर पाळत ठेऊन प्रयत्न हाणून पाडले पाहिजे. संघटित गुन्हेगारी गटाने लॉकडाउनच्या काळात ड्रग्सची कमतरत भासू नये म्हणून चाणाक्ष पद्धतीने जोखीम वाढवून नियोजन केले आहे. प्रामुख्याने भारत आणि आसापास अफू आणि मेथॅम्फेटामाइन्स या ड्रग्सची वाहतूक आणि निर्माण केले जाते. भोगोलिक रित्या भारत हा या अवैध ड्रग्स तस्करीच्या मार्गात बरोबर मध्यावर आहे. कारण हे ड्रग्स गोल्डन त्रिकोण, आणि गोल्डन क्रेसेंट नामक प्रमुख मार्गामधून एका देशातून दुसर्‍या देशात पोहोचवले जातता. या मधील सोनेरी त्रिकोण    बांगलादेशात दाखल झालेला आहे आणि बाकीचे मार्ग हे म्यानमार, लाओस आणि थायलंड मधून भारतीय बंगालचा उपसागरा मधून मार्गस्थ होतात या देशात अफूची शेती अधिक प्रमाणात केली जाते आणि पाठवला ही जातो. कोरोनाच्या काळाला ही हे चित्र बदलले नाही. भारततच्या पूर्वेला  सोनेरी त्रिकोण आणि पश्चिमेला सोनेरी चंद्रकोर (गोल्डन क्रेसेंट) या मध्ये अफगाणिस्तान, ईरान, आणि पाकिस्तान सारखे देश आहेत ते अश्या कार्यास पुढाकार घेत असतता.

भारतीय यंत्रानेसमोर एक मोठा आव्हान तयार झाले आहे. सीमाभाग अतिशय दुर्गम आणि कठीण आहे या भागात नियंत्रण करणे कठीण होते त्यामुळे तस्करी करणारी टोळी येथून आरामात सुटते. यावर उपाय करण्यासाठी सैन्याची गस्त दुर्गम भागात वाढवणे विशेष अधिकारी नेमणे उपयुक्त ठरेल. सरकारने ड्रग्स बनवण्यासाठी लागनारा कच्चामाल ताब्यात घेऊन कडक कारवाई केली पाहिजे. लॉकडाउनच्या काळात ड्रग्सच्या किमती देखील कमी करण्यात आल्या आहेत त्यामुळे मागणी मध्ये वाढ दिसून आली आहे. कोरोनामध्ये बदलत चाललेले यंत्रणाच पूर्णपने लक्षं ठेवणे महत्वाचे आहे.सर्वच गोष्टी सरकार, पोलिस यंत्रणाने करावे असे नाही सामानी नागरिकांनी चोकस राहने महत्वाचे आहे.

 

प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे,

रसायनशास्त्र विभाग

विवेकानंद कॉलेज कोल्हापूर


Comments

  1. Nice & informative
    Dr. V. D. Jadhav

    ReplyDelete
  2. Nice information sir 👍👍 thanks sir 👍👍

    ReplyDelete
  3. Need to take serious action on drug trafficaking

    ReplyDelete
  4. खूपच सुंदर लिखाण सर्वसामान्य लोकांना त्यांच्या सोप्या भाषेत योग्य आणि वैज्ञानिक माहिती पुरवत आहात 👍👍
    शुभेच्छा

    ReplyDelete
  5. Rohan Sidanale13 June 2020 at 22:35

    ������

    ReplyDelete
  6. Sagla band hoil pn iligal gosthi band hot nahit he khup vait aahe

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Corona Series Part 39 : कोरोना, आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग

Corona Series Part 39       नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोना , आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग जगात असा एक ही देश नसेल जिथे ज्ञानाचा भंडार असणारे भारतीय लोक त्या देशाच्या प्रगतिमध्ये सहभागी नाहीत. कोरोनाच्या लढ्यात तरी हे मागे कशी राहतील. सिरम इंडिया लिमिटेड पुणे स्थित जैव तंत्रज्ञानातील अग्रणी कंपनी आहे यां कंपनीचे वैशिष्ट्य म्हणजे या पूर्वी ही hepatitis, पोलीओ , स्वाइन फ्लू इत्यादि आजारामध्ये लस निर्माण करण्याचे महत्वाचे योगदान आहे. वर्षभरात १.५ अब्ज लसीचे डोस अतिशय माफक दरात तयार करण्याची क्षमता असणारी या कंपनीचे उत्पादन यूरोपियन देशात व संशोधन यूनिट पुणे सारख्या शहरात आहे. भारतामध्ये एक ही नोबेल परितोषिक किवा औषधाचा स्वामित्व हक्क नाही तरीही औषध , लस उत्पादन करण्यात प्रावीण्य , विश्वसनीय नावलौकिक मिळवणारा देश आहे. जावपास ८०% लस आफ्रिका सारख्या देशात पुरवेल जातात. कोरोनाची लस निर्माण करण्यासाठी न्यूयॉर्क मधील codagenic या...

पुन्हा कधीही कोरोना सारख्या महामारीमुळे लेख लिहायची वेळ येऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे आज काय लिहावे आणि काय नको समजेनासे झाले आहे. तरी धाडस करून लिहित आहे. काही चुकले तर समजून घ्यावे ही विनंती.   मार्च महिन्यामध्ये जगात नवीन विषाणू ने धुमाकूळ घातला होता सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शास्त्रज्ञ , संशोधक , मीडिया , नेते , उद्योजक , आणि सामान्य जनता सर्वच नागरिकांना पुढे काय वाहून ठेवले आहे याची कल्पना नव्हती. परिस्थितीचे आकलन होण्याचा आतच लॉकडाउन झाला तेव्हा सुट्टीचा आनंद घेऊया असे समजून काही नागरिक मस्त मजेत होते. हळू हळू परिस्थिती बदलून गंभीर झाली , पण नेमके काय चालू आहे काय करावे आणि काय करू नये याचा अंदाज लागेना. मीडिया मध्ये रोज के भीतीदायक बातमी येऊ लागली कधी विषाणू वर असलेले उपाया येऊ लागले पण शास्त्रीय माहिती सजत नसल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ लागले . अश्या मध्ये रसायनशास्त्राचा विद्यार्थी म्हणून कोरोना विषाणूच्या विरोधात   काही काम करावे असे वाटत होते परंतु संशोधन करण्यासाठी काही मर्यादा होत्या याचे भान होते पण शांत बसून चालणार नाही हे लक्षात आले होते. म्हणून मनातून ठरवले आज या संकटकाळी समजासाठी आप...

Corona Series Part 38 : कोरोना, आणि चीनी वैद्यकीय उपकरणे

Corona Series Part 38       नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोना , आणि चीनी वैद्यकीय उपकरणे एखाद्या व्यक्तिच्या मजबूरीचा स्वतच्या फायद्यासाठी कसा उपयोग करून घेता येईल याचे सर्वोत्तम प्रशिक्षण चीनमध्ये मिळते. चीन म्हणजे धोखेबाजी , अविश्वास् याचा अनुभव सर्वांनी घेतला आहे तरी देखिल मजबूरी म्हणून काही व्यवहारीक जुगार चीनशी करावे लागत आहेत. त्यातील एक म्हणजे वैद्यकीय उपकरण खरेदी. नोहेंबर ते फेब्रुवारी च्या दरम्यान चीन मध्ये कोरोना चे संक्रमण जोरावर असल्याने चीन मधील काही प्रांत बंद होते , या विषाणूच्या बाबतीतील माहीत सुरवातीपासूंनच लपवण्यात आल्यामुळे चीन व्यतिरिक्त ईतर जग सुरळीत चालू होते , आणि एकदा हा विषाणू चीन मधून सार्‍या जगात पसरला तेव्हा ईतर देशांची या विषाणू च्या विरोधात लडण्याची तयारी नसल्याने विषाणूचे संक्रमण जलत गतीने पसरू लागले. तेव्हा वैद्यकीय उपकरणे जसे मास्क , तपासणी किट , संरक्षक किट , वेंटीलेटर , ईत्यादी उपकरणाची मागणी आणि ...