Skip to main content

Corona Series Part 79 : कोरोना, आणि शस्त्रक्रिया

Corona Series Part 79

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/

 

कोरोना, आणि शस्त्रक्रिया

मागील काही दिवसापासून मानवी शरीराचा कोरोना हा एकमेव शत्रू आहे असे काहीसे चिंताजनक  वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना सीझन चालू झाल्यापासून मोठ मोठे हॉस्पिटल सुधा रिकामी दिसू लागली होती. कधी कधी वाटते कोरोनाआधी रुग्णालयात गरज नसतांनाचा औषध उपचार करत होते की काय! परंतु असे नसून मेडिकल हेल्थ आणि फॅमिली वेलफेर नुसार अतिआवश्यक नसलेले सारे औषध उपचार आणि शस्त्रक्रिया लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेणायात आला होता. अतिआवश्यक नसलेल्या म्हणजे नक्की कोणत्या प्लॅस्टिक सर्जरी, प्रथम टप्प्यात असणार्‍या कर्करोग, पित्ताशयातील खडे काढणे, मुतखडा, हर्निया, डोळ्याचा अश्या ठरवून केल्या जाणार्‍या ईत्यादी शस्त्रक्रिया. स्क्रोल इन या वेबसाइटच्या परीक्षणानुसार मार्च महिन्यापासून आज पर्यन्त ५लाख शस्त्रक्रिया या लांबणीवर टाकण्याता आल्या दिल्ली आणि उत्तर प्रदेशमधील ५१ मेडिकल कॉलेज मध्ये देखील तातडीच्या शस्त्रक्रिया सोडून ईतर शस्त्रक्रिया थांबण्यात आल्या किंबहुना, सपूर्ण भारतता हेच चित्र होते. या शस्त्रक्रिया का लांबणीवर टाकण्यात आल्या, त्याचा नागरिकांवर परिणाम काय झाला हा एक चर्चेचा भाग आहे.

 

ब्रिटिश जर्नल ऑफ सर्जरी मध्ये १८ मे रोजी प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार ५,८५,००० अतिआवश्यक नसलेल्या अंदाजे ४८७२८प्रती आठवडा अश्या शस्त्रक्रिया थाबवल्या याचे कारण म्हणजे कोरोना विषाणू असले तरी अजून बरीच कारणे आहेत शासकीय रुग्णालय आणि सर्व कर्मचारी कोरोना विषाणू रोखन्याच्या मोहिमेवर होते तसेच सर्व वैद्यकीय पायाभूत सुविधा देखिल याचा यंत्रणेत आहेत यामुळे लसीकरणा मोहीम सुधा रखडली होती. तसेच एरोसोल हे एक महत्वाचे कारण आहे कारण लप्रोस्कोपी, एंडोस्कोपी सारख्या शस्त्रक्रियेमध्ये एरोसोलचे प्रमाण अधिक असते त्यामुळे वेगवेगळ्या विषाणूचे संक्रमण होण्याची संधी भरपूर असते. लॉकडाउनच्या काळात कोरोनासाठी लागणारे पीपीई किटची उपलब्धता, भयगंड अश्यागोष्टी मुळे खाजगी रुग्णालयात देखील शस्त्रक्रिया झाल्या नाहीत. अतिआवशक्यता जरी नसली तरीही डॉक्टर आणि रुग्ण यांचा संमतीने ठरवलेल्या वेळी शस्त्रक्रिया होणे हे देखील खूप महत्वाचे आहे. कारण रुग्णाची शस्त्रक्रिया करून घेण्याची मानसिकता बनलेली असते तेव्हा शस्त्रक्रिया झाल्यास अधिक प्रभावी आणि कमी त्रासदायक होऊ शकते. जर्नल ऑफ व्हिसेराल सर्जरी मधील संशोधनामध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनामध्ये या विषयावर चर्चा केली आहे. काही उदाहरणे पाहू प्रथम टप्प्यातील कर्करोग हा प्राथमिक अवस्थेत असताना त्याचा समूळ नाश केला तर रुग्णाचे पुढील आयुष्य कमी त्रासाचे होऊ शकते. स्तनाचा कर्करोगावर औषध उपचार करीत असताना त्याचे पुनर्बांधनी मध्ये वेळ दवडून चालत नाही. त्याचबरोबर cleft palate, craniofacial disorder, gender reassignment, appendix, अश्या विविध शस्त्रक्रिया ठरवून करणार्‍या असल्या तरीही त्याचे महत्वकमी होत नाही वेळ असताना केल्या गेल्या नाहीत तर जिवावर बेतू शकतात. प्राथमिक अवस्थेत कर्करोगाचे निराकरण करणे किंवा धमण्या मध्ये असणारे अडथळे वेळीच उपाययोजना केली नाही तर काय होऊ शकते याची कल्पना आपल्या सर्वांना असेलच. Indian institute of public health यांचा अंदाजनुसार थकीत राहिलेल्या शस्त्रक्रिया करण्यासाठी लॉकडाउन नंतर रोज २०% अधिक वेळ आणि डॉक्टर, कर्मचारी लागणार आहेत.  यामधून मार्ग काढण्यासाठी अमेरिकेमध्ये अमेरिकन कॉलेज ऑफ सर्जन यांनी १० महत्वाच्या गोष्टी सुचवल्या आहेत. हा प्रश्न सोडवण्यासाठी स्थानिक पातलीवर निर्णय घेणे गरजेचे आहे. आसपासच्या भागात असणारी रुग्णसंख्या, वैद्यकीय सेवा, संक्रमनाचे प्रमाण या सार्‍या बाबींचा विचार करणे गरजेचे आहे. रुग्णालयातील कर्मचारी ईतर रुग्ण डॉक्टरया सर्वांची तपासणी करणे. रुग्णाचे प्राधान्य त्याचे आरोग्य आणि असणारा आजार यावरून ठरवले पाहिजे. Pre-operative, immediate pre-oprative, intra-oprative आणि पोस्ट-oprative या सर्वच ठिकाणी प्रकर्षाने काळजी घेणे गरजेचे आहे परंतु, हे सर्व भारतामध्ये किती शक्य आहे अमेरिकेतील मार्गदर्शक तत्वे भारतात लावून चालणार नाहीत म्हणून आयसीएमआर ने या शस्त्रक्रियेसाठी मार्गदर्शक तत्वे आखून देणे गरजेचे आहे.

 

प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे,

रसायनशास्त्र विभाग

विवेकानंद कॉलेज कोल्हापूर


Comments

Post a Comment