Skip to main content

Corona Series Part 72 : कोरोना, आणि हर्ड इम्यूनिटी

Corona Series Part 72

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/

 

कोरोना, आणि हर्ड इम्यूनिटी

कोरनाशी लढा देताना विविध प्रकारचे प्रयोग केले जात आहेत भारत आणि ईतर बर्‍याच देशात विलगीकरणाची पद्धत वापरली जात आहे. कालच्या लेखामध्ये हर्ड इम्यूनिटीचा उल्लेख झाला हर्ड इम्यूनिटी म्हणजे काय हे एक उदाहरनाने थोडक्यात समजून घेतले या संदर्भात विस्तारीत माहीत घेणे आवशक्य आहे. मार्च महिन्याच्या दरम्यान चीन नंतर युरोप खंड कोरणाचे केंद्र बिन्दु बनला होता अश्या वेळी बचावासाठी सारे देश विलगीकरणाची पद्धत वापरात असताना एकमेव यूकेमध्ये मात्र हर्ड इम्यूनिटी (कळपामध्ये नैसर्गिक रित्या निर्माण होणारी रोग प्रतिकारक शक्ति) या पद्धतीचा वापर करण्याचा विचार चालू होता. प्रामुक्याने विलगीकरनाच्या प्रक्रियेमध्ये लॉकडाउन हे मुख्यशस्त्र आहे आणि याचा उलट हर्ड इम्यूनिटी मध्ये लॉकडाउन केले जात नाही म्हणून यूकेमध्ये. शाळा, कॉलेज, चित्रपटगृह, व्यवसाय सर्व सुरू होते. तसेच यूकेच्या पंतप्रधान आणि मुख्य शास्त्रज्ञ यांचा विचारानुसार यूके मधील नगरिकांमध्ये नैसर्गिक रित्या रोगप्रतीकरक शक्ति निर्माण झाली पाहिजे असे घडल्यास कोरोनाचा फैलाव होणार नाही आणि कोणतेही औषध आणि लसची आवशक्यता लागणार नाही. या विषयावरून वर्ल्ड इकनॉमिक फोरेमने एक संशोधन Can-Herd immunity protect us from corona virus प्रसिद्ध केले.  

 

हर्ड इम्यूनिटी समजून घेताना लस काशी काम करते ते पाहू ज्या विषाणू च्या विरोधात लस कडचि आहे त्या विषणूचा कमी ताकतीतीचा विषाणू मानवाच्या शरीराता सोडला जातो आता adaptive immunity विषाणूला ओळखून त्याच विरोधात अॅंटीबॉडीज तयार करते आणि विषाणूचे झालेली ओळख आयुष्यभर लक्षात ठेवली जाते म्हणजेच मूळ सामना रोगप्रतकार शकतीच करते

लस फक्त आपल्या रोगप्रतिकार शक्तिला विषाणूच्या विरोधतात काम करण्यासाठी प्रवृत करते. असे असली तरीही युकेची हर्ड इम्यूनिटी कोरोना विरोधात वापरण्याची ररीत अपयशी ठरली कारण नैसर्गिक रित्या विषाणू विरोधात अॅंटीबॉडी तयार करणे सहज शक्य नाही कारण सध्या बर्‍याच लोकांच्या खान्याच्या पद्धती बदलती जीवनशैली आणि आधी पासून असणार्‍या व्याधी यामुळे रोगप्रतिकार शक्तिची तडजोड झाली आहे. त्यामुळे हर्ड इम्यूनिटी सारखी नैसर्गिक रोगप्रतीकरक शक्ति २ ते ३% लोकांच्या मध्ये आढळून येते. असे मजबूत रोगप्रतीकरक शक्ति असणारे लोक ७०-८०% असते तर कोरोना विषणूचा फैलावा असा झाला नसता. दीर्घकालीन विचार करता हर्ड इम्यूनिटी संकल्पना योग्य आणि चांगली असली तरी सध्या कोरोंना सारख्या वैश्विक महामारी मध्ये याचा वापर करुन कमी कालावधीमध्ये फार मोठा चांगला परिणाम पाहवयास मिळणे कठीण आहे.  

 

प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे,

रसायनशास्त्र विभाग

विवेकानंद कॉलेज कोल्हापूर

 


Comments

  1. Sir,your efforts regarding deadly disease covid-19's keen information and creating awareness amongst people is very nice.

    ReplyDelete
  2. Thanks sirr 👍 nice information sir 👍👍

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Corona Series Part 39 : कोरोना, आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग

Corona Series Part 39       नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोना , आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग जगात असा एक ही देश नसेल जिथे ज्ञानाचा भंडार असणारे भारतीय लोक त्या देशाच्या प्रगतिमध्ये सहभागी नाहीत. कोरोनाच्या लढ्यात तरी हे मागे कशी राहतील. सिरम इंडिया लिमिटेड पुणे स्थित जैव तंत्रज्ञानातील अग्रणी कंपनी आहे यां कंपनीचे वैशिष्ट्य म्हणजे या पूर्वी ही hepatitis, पोलीओ , स्वाइन फ्लू इत्यादि आजारामध्ये लस निर्माण करण्याचे महत्वाचे योगदान आहे. वर्षभरात १.५ अब्ज लसीचे डोस अतिशय माफक दरात तयार करण्याची क्षमता असणारी या कंपनीचे उत्पादन यूरोपियन देशात व संशोधन यूनिट पुणे सारख्या शहरात आहे. भारतामध्ये एक ही नोबेल परितोषिक किवा औषधाचा स्वामित्व हक्क नाही तरीही औषध , लस उत्पादन करण्यात प्रावीण्य , विश्वसनीय नावलौकिक मिळवणारा देश आहे. जावपास ८०% लस आफ्रिका सारख्या देशात पुरवेल जातात. कोरोनाची लस निर्माण करण्यासाठी न्यूयॉर्क मधील codagenic या...

Corona Series Part 56 : कोरोना, आणि ई-शिक्षण

Corona Series Part 56 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. आजचा विषय विस्तृत मांडला आहे.   या विषया बाबतीत आपण आपले मत ब्लॉगवर जरूर कळवावे ही विनंती.     https://ajinkya1030.blogspot.com   कोरोना , आणि ई-शिक्षण मार्च महिन्यापासन कोरोनाचा प्रभाव दिसू लागला शेवटच्या आठवड्यापासून शाळा , कॉलेज लॉकडाउनच्या काळापासून आज पर्यन्त बंद करण्यात आल्या. भितीदायक वातावरणामध्ये १० , १२वी च्या परीक्षा घेण्यात आल्या. शैक्षणिक वर्ष २०१९-२० चे कार्य संपत आले होते परंतु लेखी आणि मौखिक परीक्षा राहिल्या होत्या . आणि आता यूजीसीच्या मार्गदर्शंनानुसार त्या राहूनच जातील. किंवा काही अंशी तात्पुरती योजना राबवून काही ना काही मार्ग काडला जाईल.   नैसर्गिक आपत्ती महापुर , वैश्विक महामारी मधून शैक्षणिक क्षेत्रा समोर नवीन आव्हान उभे राहिले आहे. खाजगी , काही सरकारी शाळा , कॉलेजने देखील तात्पुरती सोय करण्यासाठी ऑनलाइन तास झूम , गूगल क्लासरूम , गूगल डॉक , यू ट्यूब , व्हाट्स अप...

पुन्हा कधीही कोरोना सारख्या महामारीमुळे लेख लिहायची वेळ येऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे आज काय लिहावे आणि काय नको समजेनासे झाले आहे. तरी धाडस करून लिहित आहे. काही चुकले तर समजून घ्यावे ही विनंती.   मार्च महिन्यामध्ये जगात नवीन विषाणू ने धुमाकूळ घातला होता सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शास्त्रज्ञ , संशोधक , मीडिया , नेते , उद्योजक , आणि सामान्य जनता सर्वच नागरिकांना पुढे काय वाहून ठेवले आहे याची कल्पना नव्हती. परिस्थितीचे आकलन होण्याचा आतच लॉकडाउन झाला तेव्हा सुट्टीचा आनंद घेऊया असे समजून काही नागरिक मस्त मजेत होते. हळू हळू परिस्थिती बदलून गंभीर झाली , पण नेमके काय चालू आहे काय करावे आणि काय करू नये याचा अंदाज लागेना. मीडिया मध्ये रोज के भीतीदायक बातमी येऊ लागली कधी विषाणू वर असलेले उपाया येऊ लागले पण शास्त्रीय माहिती सजत नसल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ लागले . अश्या मध्ये रसायनशास्त्राचा विद्यार्थी म्हणून कोरोना विषाणूच्या विरोधात   काही काम करावे असे वाटत होते परंतु संशोधन करण्यासाठी काही मर्यादा होत्या याचे भान होते पण शांत बसून चालणार नाही हे लक्षात आले होते. म्हणून मनातून ठरवले आज या संकटकाळी समजासाठी आप...