Skip to main content

Corona Series Part 71 : कोरोना, आणि मोनोक्लोनल अॅंटीबॉडीज

 Corona Series Part 71

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/

 

कोरोना, आणि मोनोक्लोनल अॅंटीबॉडीज

इस्रायल सारख्या देशाने कोरोना च्या विषाणू सोबात समाधानकारक सामना केला. जवळपास लोकसंखेच्या १०% किंवा त्याहून जास्ती तपासण्या केल्या गेल्या. कोरोनाचे संक्रमण झालेले रुग्ण १७०१२ असून नीव्वळ २८४ मृत्यू झाले आहेत. कोरोना रोखून गप्प न बसता कोरोनावर संशोधन करत मोनोक्लोनल अॅंटीबॉडीजचा शोध लावला. हा काय प्रकार आहे आपण उदाहरनाने  समजून घेऊया. समजा 3 व्यक्ति आहेत अ, ब आणि क या मध्ये अ मधील व्यक्तीस श्वसनसंस्थेचा त्रास आहे आणि त्यास सध्या कोरोना विषाणू ची बाधा झाली आहे असा व्यक्ति कोरोनाशी सहज सामना करू शकत नाही त्यास आतिदक्षत विभागामध्ये औषधे आणि वेंटीलेटरच्या सहयाने प्राणवायू देण्याची गरज भासेल कोरोंना मुक्त होण्यास दिरंगाई होऊ शकते. आता ब या व्यक्तीस कोरोना संसर्गाची कल्पांनाच नाही सदर व्यक्ति ही लक्षणे नसणारी कोरोंना बाधित व्यक्ति आहे या पासून कोरणाचा फैलाव सहज होऊ शकतो या व्यक्तीस देखील औषध उपचार कारावा लागतो. क या व्यक्तीस 3 आठवड्यापूर्वी कोरोनाचे संक्रमन झाले होते परंतु या व्यक्तीची रोगप्रतिकार शक्ति नैसर्गिक रित्या चांगली असल्याने या व्यक्तिमध्ये नैसर्गिक पद्धतीने कोरोना विषाणू विरोधात अॅंटीबॉडीज तयार होत्या त्यामुळे हा व्यक्ति सुरक्षित राहिला यालाच हर्ड इम्मुंनीटी म्हणतात. अडचण अशी आहे जगात असे व्यक्ति फक्त २ते ३% आहेत त्यामुळे  ब्रिटन मध्ये या हर्ड इम्मुंनीटीचा प्लान फसला. जर आधिपसूंचा मानसाच्या शरीरात कोरोना विषाणू विरोधात अॅंटीबॉडीज असतील तर कोरोनाची बाधा होत नाही अश्या व्यक्ति ईतर व्यकतीस बरे करू शकतात. अॅंटीबॉडीज म्हणजे एक सुरक्षा करणारे प्रथिने असून प्लाजमा थेरेपीचा वापर करून प्लाजमा स्थानांतर करू शकतो परंतु, ही थेरेपी देखील १००% योग्या नाही.

इस्राईलच्या शास्त्रज्ञांनी याचा विचार करून क सारख्याव्यक्तीच्या शरीरातून प्लाजमा मधून फक्त मोनोक्लोनल अॅंटीबॉडीज वेगळ्या केल्या आहेत आणि त्या बाधित व्यक्तीच्या व्यक्तिच्या शरीरात इंजेक्ट करू शकतो त्यामुळे बाधित रुग्ण बरा होऊ शकतो. परंतु या मोनोक्लोनल अॅंटीबॉडीज रुग्णच्या शरीरात मिळत्या जुळ्या झाल्या नाहीत तर अडचणीचे ठरू शकते. आतापर्यंत इस्राईल सोडले तर कोरोनावर कोणत्याही देशाच्या सरकारने लस किंवा औषध बनल्याचे जाहीर केले नाही. परंतु या मोनोक्लोनल अॅंटीबॉडीज चा उपाय मात्र इस्राईलच्या सुरक्षा मंत्रालयाने जाहीर सगीतले त्याचे कारण इस्राईल इंस्टीट्यूट ऑफ बायोलॉजिकल रिसर्च (IIBR) हे अशी संस्था आहे ज्याचे रेपोर्टिंग थेट इस्राईलच्या पंतप्रधानाकडे  होते. त्यामुळे सशोधनासाठी लागणारे वित्तीय सहाय्य जास्त आणि लगेच केले जाते. काही मोजक्याच देशात अशी योजना आहे. भारतात संशोधनासाठी वित्तीय सहाय्य हवे असल्यास लांबलचक प्रक्रिया करावी लागते तेव्हा ही सहाय्य मिळेल याची शाश्वाती नसते. असो, IIBR संस्थेने जे मोनोक्लोनल अॅंटीबॉडीज वेगळ्या केल्या आहेत ते संशोधन लसच्या देसखील पुढे आहे परंतु हे लसच्या एवजी पर्याय होऊ शकत नाही हा एक तात्पुरता पर्याय म्हणाता येईल.  

 

 प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे,

रसायनशास्त्र विभाग

विवेकानंद कॉलेज कोल्हापूर


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Corona Series Part 39 : कोरोना, आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग

Corona Series Part 39       नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोना , आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग जगात असा एक ही देश नसेल जिथे ज्ञानाचा भंडार असणारे भारतीय लोक त्या देशाच्या प्रगतिमध्ये सहभागी नाहीत. कोरोनाच्या लढ्यात तरी हे मागे कशी राहतील. सिरम इंडिया लिमिटेड पुणे स्थित जैव तंत्रज्ञानातील अग्रणी कंपनी आहे यां कंपनीचे वैशिष्ट्य म्हणजे या पूर्वी ही hepatitis, पोलीओ , स्वाइन फ्लू इत्यादि आजारामध्ये लस निर्माण करण्याचे महत्वाचे योगदान आहे. वर्षभरात १.५ अब्ज लसीचे डोस अतिशय माफक दरात तयार करण्याची क्षमता असणारी या कंपनीचे उत्पादन यूरोपियन देशात व संशोधन यूनिट पुणे सारख्या शहरात आहे. भारतामध्ये एक ही नोबेल परितोषिक किवा औषधाचा स्वामित्व हक्क नाही तरीही औषध , लस उत्पादन करण्यात प्रावीण्य , विश्वसनीय नावलौकिक मिळवणारा देश आहे. जावपास ८०% लस आफ्रिका सारख्या देशात पुरवेल जातात. कोरोनाची लस निर्माण करण्यासाठी न्यूयॉर्क मधील codagenic या...

Corona Series Part 56 : कोरोना, आणि ई-शिक्षण

Corona Series Part 56 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. आजचा विषय विस्तृत मांडला आहे.   या विषया बाबतीत आपण आपले मत ब्लॉगवर जरूर कळवावे ही विनंती.     https://ajinkya1030.blogspot.com   कोरोना , आणि ई-शिक्षण मार्च महिन्यापासन कोरोनाचा प्रभाव दिसू लागला शेवटच्या आठवड्यापासून शाळा , कॉलेज लॉकडाउनच्या काळापासून आज पर्यन्त बंद करण्यात आल्या. भितीदायक वातावरणामध्ये १० , १२वी च्या परीक्षा घेण्यात आल्या. शैक्षणिक वर्ष २०१९-२० चे कार्य संपत आले होते परंतु लेखी आणि मौखिक परीक्षा राहिल्या होत्या . आणि आता यूजीसीच्या मार्गदर्शंनानुसार त्या राहूनच जातील. किंवा काही अंशी तात्पुरती योजना राबवून काही ना काही मार्ग काडला जाईल.   नैसर्गिक आपत्ती महापुर , वैश्विक महामारी मधून शैक्षणिक क्षेत्रा समोर नवीन आव्हान उभे राहिले आहे. खाजगी , काही सरकारी शाळा , कॉलेजने देखील तात्पुरती सोय करण्यासाठी ऑनलाइन तास झूम , गूगल क्लासरूम , गूगल डॉक , यू ट्यूब , व्हाट्स अप...

पुन्हा कधीही कोरोना सारख्या महामारीमुळे लेख लिहायची वेळ येऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे आज काय लिहावे आणि काय नको समजेनासे झाले आहे. तरी धाडस करून लिहित आहे. काही चुकले तर समजून घ्यावे ही विनंती.   मार्च महिन्यामध्ये जगात नवीन विषाणू ने धुमाकूळ घातला होता सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शास्त्रज्ञ , संशोधक , मीडिया , नेते , उद्योजक , आणि सामान्य जनता सर्वच नागरिकांना पुढे काय वाहून ठेवले आहे याची कल्पना नव्हती. परिस्थितीचे आकलन होण्याचा आतच लॉकडाउन झाला तेव्हा सुट्टीचा आनंद घेऊया असे समजून काही नागरिक मस्त मजेत होते. हळू हळू परिस्थिती बदलून गंभीर झाली , पण नेमके काय चालू आहे काय करावे आणि काय करू नये याचा अंदाज लागेना. मीडिया मध्ये रोज के भीतीदायक बातमी येऊ लागली कधी विषाणू वर असलेले उपाया येऊ लागले पण शास्त्रीय माहिती सजत नसल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ लागले . अश्या मध्ये रसायनशास्त्राचा विद्यार्थी म्हणून कोरोना विषाणूच्या विरोधात   काही काम करावे असे वाटत होते परंतु संशोधन करण्यासाठी काही मर्यादा होत्या याचे भान होते पण शांत बसून चालणार नाही हे लक्षात आले होते. म्हणून मनातून ठरवले आज या संकटकाळी समजासाठी आप...