Skip to main content

Corona Series Part 68: कोरोना, आणि लक्षद्वीप

Corona Series Part 68

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/

कोरोना, आणि लक्षद्वीप

कोची पासून जवळ अरबी समुद्रामद्धे पर्यटनासाठी प्रसिद्ध ३२ स्क्वेर किलोमीटर क्षेत्रफळ आणि फक्त १.४५लाख लोकसंख्या असणारा बेटांचा समूह जिथे आज पर्यन्त कोरोना विषाणूला प्रवेश करू शकला नाही. भारतामध्ये या रविवार पर्यन्त सिक्किम, नागालँड, आणि लक्षद्वीप या राज्य आणि केन्द्र्शासित प्रदेशमध्ये कोरोंनाचा शिरकाव नव्हता. परंतु २४ आणि २५ मे रोजी सिक्किम, नागालँड मध्ये १ रुग्ण सापडला, कोरोना विषाणू भारतामध्ये आल्या पासून आज पर्यन्त महाराष्ट्र मध्ये सर्वात जास्त रुग्ण सापडले आजही रुग्ण संख्या वाढत चालली आहे. त्याचा खालोखाल केरळ मध्ये रुग्ण होते. केरळ मधून लक्षद्वीपमध्ये रुग्ण वाढण्याची शक्यता दाट  होती परंतु प्रथम केरळने मात्र कोरोना संक्रमण रोखण्यात यश मिळवले याचा नकळत फायदा लक्षद्वीपला झाला. कष्ट करणार्‍याला नशिबाची साथ या प्रमाणे लक्षद्वीपमध्ये देखील प्रशासनांने कडक अंमलबजावणी केली. भारतामध्ये लॉकडाउन घोषित होण्याच्या आधीच ९ मार्च २०२० रोजी परदेशी प्रवासी नागरिकान बंदी करण्यात आली तर भारतीय नागरिकांना 22 मार्च पासून प्रवास बंदी करण्यात आली. आरोग्य अधिकारी डॉ सुंदरवादिवेला यांचा समूहाने आशा, आंगणवाडी ईत्यादि असामान्य कामगिरी केली. आशा, आंगणवाडी कोरोना योद्धे घरोघरी जाऊन परीक्षण करून कोरोनासाठी उपयुक्त अशी माहीत संकलित केली. तसेच १९२१ नंबर असणारी हेल्पलाईन चे काम देखिल सुरळीत चालू होते.  लक्षद्वीप बेट हे आरोग्य सेवेसाठी केरळ वर अवलंबून आहे यामुळे संसर्ग होण्याची शक्यता लक्षात घेऊन बाहेर जाताना आणि येताना अशी दोन्ही वेळा तपासणी केली गेली. विलगिकरनाची रचने मधून कोणालाही सूट दिली गेली नाही. सर्वांना सक्ती करण्यात आली होती जारी केरळ मधून एखादा नागरिक १४ दिवस विलगीकरण पूर्ण करून आला असला तरीही लक्षद्वीप यायचे असल्यास ईथेही १४ दिवस विलगीकरनामद्धे राहणे सक्ती चे केली गेले. कोरोना व्यतिरिक्त कोणतीही आरोग्य सेवा घ्याची असल्यास प्राथमिकता ठरवून जहाज किवा चॉपरने त्या व्यक्तीस केरळला घेऊन जाण्याची सोय केली गेली. ई- जागृत नावाचे ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातूनच ई- पास ची सोय करण्यात आली. केरळ आणि लक्ष्वदीप या दोन्ही ठिकाणची मान्यता घेणे बंधनकारक होते. काही नियम आणि अटी जाचक जारी वाटत असल्या तरी त्याची अंमलबजावणी करणे हे अत्यंत महत्वाचे होते आणि ते केल्यामुळेच आज  लक्षद्वीपमध्ये कोरोंनाचा शिरकाव होऊ शकला नाही. छोट्याश्या केन्द्र्शाशीत प्रदेशाकाढून मोठ मोठ्या राज्यांनी कोरोंनाशी कसे लढले पाहिजे याचे प्रशिक्षण घेतले पहिजे.

 

प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे,

रसायनशास्त्र विभाग,

विवेकानंद कॉलेज कोल्हापूर

https://ajinkya1030.blogspot.com

Comments

  1. Nice information sir 👍👍 thanks sir 👍👍

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Corona Series Part 39 : कोरोना, आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग

Corona Series Part 39       नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोना , आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग जगात असा एक ही देश नसेल जिथे ज्ञानाचा भंडार असणारे भारतीय लोक त्या देशाच्या प्रगतिमध्ये सहभागी नाहीत. कोरोनाच्या लढ्यात तरी हे मागे कशी राहतील. सिरम इंडिया लिमिटेड पुणे स्थित जैव तंत्रज्ञानातील अग्रणी कंपनी आहे यां कंपनीचे वैशिष्ट्य म्हणजे या पूर्वी ही hepatitis, पोलीओ , स्वाइन फ्लू इत्यादि आजारामध्ये लस निर्माण करण्याचे महत्वाचे योगदान आहे. वर्षभरात १.५ अब्ज लसीचे डोस अतिशय माफक दरात तयार करण्याची क्षमता असणारी या कंपनीचे उत्पादन यूरोपियन देशात व संशोधन यूनिट पुणे सारख्या शहरात आहे. भारतामध्ये एक ही नोबेल परितोषिक किवा औषधाचा स्वामित्व हक्क नाही तरीही औषध , लस उत्पादन करण्यात प्रावीण्य , विश्वसनीय नावलौकिक मिळवणारा देश आहे. जावपास ८०% लस आफ्रिका सारख्या देशात पुरवेल जातात. कोरोनाची लस निर्माण करण्यासाठी न्यूयॉर्क मधील codagenic या...

Corona Series Part 56 : कोरोना, आणि ई-शिक्षण

Corona Series Part 56 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. आजचा विषय विस्तृत मांडला आहे.   या विषया बाबतीत आपण आपले मत ब्लॉगवर जरूर कळवावे ही विनंती.     https://ajinkya1030.blogspot.com   कोरोना , आणि ई-शिक्षण मार्च महिन्यापासन कोरोनाचा प्रभाव दिसू लागला शेवटच्या आठवड्यापासून शाळा , कॉलेज लॉकडाउनच्या काळापासून आज पर्यन्त बंद करण्यात आल्या. भितीदायक वातावरणामध्ये १० , १२वी च्या परीक्षा घेण्यात आल्या. शैक्षणिक वर्ष २०१९-२० चे कार्य संपत आले होते परंतु लेखी आणि मौखिक परीक्षा राहिल्या होत्या . आणि आता यूजीसीच्या मार्गदर्शंनानुसार त्या राहूनच जातील. किंवा काही अंशी तात्पुरती योजना राबवून काही ना काही मार्ग काडला जाईल.   नैसर्गिक आपत्ती महापुर , वैश्विक महामारी मधून शैक्षणिक क्षेत्रा समोर नवीन आव्हान उभे राहिले आहे. खाजगी , काही सरकारी शाळा , कॉलेजने देखील तात्पुरती सोय करण्यासाठी ऑनलाइन तास झूम , गूगल क्लासरूम , गूगल डॉक , यू ट्यूब , व्हाट्स अप...

पुन्हा कधीही कोरोना सारख्या महामारीमुळे लेख लिहायची वेळ येऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे आज काय लिहावे आणि काय नको समजेनासे झाले आहे. तरी धाडस करून लिहित आहे. काही चुकले तर समजून घ्यावे ही विनंती.   मार्च महिन्यामध्ये जगात नवीन विषाणू ने धुमाकूळ घातला होता सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शास्त्रज्ञ , संशोधक , मीडिया , नेते , उद्योजक , आणि सामान्य जनता सर्वच नागरिकांना पुढे काय वाहून ठेवले आहे याची कल्पना नव्हती. परिस्थितीचे आकलन होण्याचा आतच लॉकडाउन झाला तेव्हा सुट्टीचा आनंद घेऊया असे समजून काही नागरिक मस्त मजेत होते. हळू हळू परिस्थिती बदलून गंभीर झाली , पण नेमके काय चालू आहे काय करावे आणि काय करू नये याचा अंदाज लागेना. मीडिया मध्ये रोज के भीतीदायक बातमी येऊ लागली कधी विषाणू वर असलेले उपाया येऊ लागले पण शास्त्रीय माहिती सजत नसल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ लागले . अश्या मध्ये रसायनशास्त्राचा विद्यार्थी म्हणून कोरोना विषाणूच्या विरोधात   काही काम करावे असे वाटत होते परंतु संशोधन करण्यासाठी काही मर्यादा होत्या याचे भान होते पण शांत बसून चालणार नाही हे लक्षात आले होते. म्हणून मनातून ठरवले आज या संकटकाळी समजासाठी आप...