Skip to main content

Corona Series Part 8 : Home Quarantine and Isolation


Corona Series Part 8
      नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव लक्षात घेऊन social media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे.
Home Quarantine and Isolation
14व्या दशकात इटली च्या वेणीस शहरात लॅटिन भाषा बोली जात होती. त्याच वेळी आपल्याला माहीत असेल असाच प्लेग हा आजार आला होता तेव्हा ही जहाजाला 40 दिवस बंदरावर यायचा आधी दूर थाबाव लागत होत. जर त्या जहाजात एक ही व्यक्तिचा ह्या 40 दिवसात प्लेग हा आजाराणे मृत्यू झाला नाही तरच त्या जहाजाला बंदरावर येण्यास मुभा असायची सांगायच म्हणजे तेव्हा प्लेग साथी 40 दिवस लॉक डाउन असायचा, आज 21 दिवस लॉक डाउन आहे.
Quarantine and Isolation हे दोन वेगवेगळे शब्द आहेत. Quarantine is just like a preventive measure and Isolation means first step of treatment. कस ते पाहू
प्रशासनाने विदेशातून आलेय अनिवासी भारतीयांना किवा पुणे मुंबई मधून आपल्या गावी आलेल्या लोकांना  Home Quarantine राहण्याची सूट दिली आहे म्हणजे अजूनही त्यांना कोणतेही कोरनो ची लागण झाल्याची लक्षणे आढळून आली नाहीत फक्त त्यांचा प्रवास करोनाग्रस्त भागातून झाला आहे म्हणून त्यांना खबरदारी साठी असे सगण्यात आले. तसेच Isolation हे बर्‍याच आजारात केल जाता जसे की टी.बी, COVID-19. Isolation (विलगीकरण) म्हणजे इथ मात्र ह्या लोकांचे करोना ची टेस्ट ही पॉजिटिव आहे आणि त्यामुळेच त्यांना रुग्णालयात एक खोलीत वेगळ ठेवण्यात आलेले असते कारण त्यांच्या पासून हा आजार दुसरी कडे पोहोचू नये. आता फरक लक्षात आला असेल. Home Quarantine  असताना त्यांच्या साठी टॉयलेट, बाथरूम वेगळे असण्याची आवशयक्या आहे पण भारतासारखा देशात हे शक्य नाही. आणि Quarantine असणारे लोकं मात्र आज ही समाजात फिरताना,  पळून जाताना दिसत आहेत एक जरी व्यक्ति Home Quarantine असताना करोना ची लागण झालेली आढळला तरी त्याचे सर्व कुटुंबाला, शेजारी गल्ली मधील लोकाणा कोरोंना लागण झालेली असते. लॉक डाउन, Home Quarantine करणं हा एक प्रतीबंधात्मक उपाया आहे फक्त लॉक डाउन, Home Quarantine झाला म्हणजे कोरोंना च संकट जाणार नाही. आता पर्यन्त कोरोंना सारखा शत्रू जगत थैमान घालून देशात आला होता आता तर उबरठ्याबवर येऊन उभा राहिला आहे. इथ नुकत्याच आलेल्या तानाजी चित्रपतातील एक संवाद आठवला अगर अपनी हार सामने दिख रही है और हार मंजूर नाही हो तो सिर्फ एक ही रास्ता बचता है वो है सुलेह तशीच काहीशी परिस्थिति आहे हे लॉक डाउन, Home Quarantine म्हणजे एक प्रकारच तह आहे. देशावर आणि आपल्या सामाजिक, आर्थिक सतंत्र्यावर आलेला हे संकट आपण दूर करू शकतो त्यासाठी आपल्यात राष्ट्रीयत्वाची जाणीव करून घेणं गरजेचं आहे. राष्ट्रीयत्व म्हणजे प्रतेकवेळी हातात बंदुके घेऊन सीमावर लढण किवा आपल्याजवळील असणारे धन, वेळ देशासाठी समर्पित करना इतकाच नाही तर देशावर आलेल जैविक संकट पळवण्यासाठी साठी आज घरी स्वत:ला Quarantine करून घेण हा ही एक पैलू झाला आहे. पण आपल्या समाजात ह्या राष्ट्रीयत्वाची भावनेची उणीव आहे हे आज ही दिसून आले आहे. राष्ट्रीयत्व म्हणजे देशप्रेम जे फक्त 15 Aug आणि 26 Janला जिलेबी खाण्यापूरत, भारत पाकिस्तान match अश्या काही पूरत आपण मर्यादित ठेवलं आहे असा नसत तर आज लॉक डाउन होऊन 6 दिवस झाले तरी आपली सरकारी यंत्रान लोकांना आव्हान करण्यातच व्यस्त झाली नसती. तर वाचकांनो अजूनही वेळ गेली नाही आप्ल्यतील राष्ट्रीय चारीत्र्याची भावना जागृत करा आणि एक स्वतहला Quarantine करून घ्या. एक लक्षात घ्या की आज अमेरिका, युरोपियन देश, चीन सारखे प्रगतशील देश सुधा ह्या जैविक संकटासमोर  नतमस्तक झाले आहेत आणि ते (भारताकडे) आपल्याकडे आशेने पाहत आहेत हीच एक संधि आहे भारतीय सुजाण नागरिक म्हणून भारतीयांना जगासमोर सिद्ध करण्याची. असे झाल्यास आपन ह्या कोरोंना सारख्या वैश्विक महामारीच्या सकटातून लवकर स्वतंत्र व्हाल आणि एक आदर्श उभा करू शकाल. जस आपण नेहमी सांगतो फिरतो परदेश किती प्रगतशील, स्वछ आहेत हे असे परदेशी गोडवे गावून काही होत नाही आता आपल्याला आलेली संधि च सोन केल तर सपूर्ण जग भविष्यात आपल उदाहरण देईल. एकच म्हणन् आहे राष्ट्र प्रेम जागृत करा आणि लॉक डाउन  मध्ये सहकारी करा. अन्यथा काय होईल हे आपणा रोज न्यूज चॅनलमध्ये पाहत आहातच
प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे
रसायनशास्त्र विभाग
विवेकानंद कॉलेज कोल्हापूर

Comments

Popular posts from this blog

Corona Series Part 39 : कोरोना, आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग

Corona Series Part 39       नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोना , आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग जगात असा एक ही देश नसेल जिथे ज्ञानाचा भंडार असणारे भारतीय लोक त्या देशाच्या प्रगतिमध्ये सहभागी नाहीत. कोरोनाच्या लढ्यात तरी हे मागे कशी राहतील. सिरम इंडिया लिमिटेड पुणे स्थित जैव तंत्रज्ञानातील अग्रणी कंपनी आहे यां कंपनीचे वैशिष्ट्य म्हणजे या पूर्वी ही hepatitis, पोलीओ , स्वाइन फ्लू इत्यादि आजारामध्ये लस निर्माण करण्याचे महत्वाचे योगदान आहे. वर्षभरात १.५ अब्ज लसीचे डोस अतिशय माफक दरात तयार करण्याची क्षमता असणारी या कंपनीचे उत्पादन यूरोपियन देशात व संशोधन यूनिट पुणे सारख्या शहरात आहे. भारतामध्ये एक ही नोबेल परितोषिक किवा औषधाचा स्वामित्व हक्क नाही तरीही औषध , लस उत्पादन करण्यात प्रावीण्य , विश्वसनीय नावलौकिक मिळवणारा देश आहे. जावपास ८०% लस आफ्रिका सारख्या देशात पुरवेल जातात. कोरोनाची लस निर्माण करण्यासाठी न्यूयॉर्क मधील codagenic या...

Corona Series Part 56 : कोरोना, आणि ई-शिक्षण

Corona Series Part 56 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. आजचा विषय विस्तृत मांडला आहे.   या विषया बाबतीत आपण आपले मत ब्लॉगवर जरूर कळवावे ही विनंती.     https://ajinkya1030.blogspot.com   कोरोना , आणि ई-शिक्षण मार्च महिन्यापासन कोरोनाचा प्रभाव दिसू लागला शेवटच्या आठवड्यापासून शाळा , कॉलेज लॉकडाउनच्या काळापासून आज पर्यन्त बंद करण्यात आल्या. भितीदायक वातावरणामध्ये १० , १२वी च्या परीक्षा घेण्यात आल्या. शैक्षणिक वर्ष २०१९-२० चे कार्य संपत आले होते परंतु लेखी आणि मौखिक परीक्षा राहिल्या होत्या . आणि आता यूजीसीच्या मार्गदर्शंनानुसार त्या राहूनच जातील. किंवा काही अंशी तात्पुरती योजना राबवून काही ना काही मार्ग काडला जाईल.   नैसर्गिक आपत्ती महापुर , वैश्विक महामारी मधून शैक्षणिक क्षेत्रा समोर नवीन आव्हान उभे राहिले आहे. खाजगी , काही सरकारी शाळा , कॉलेजने देखील तात्पुरती सोय करण्यासाठी ऑनलाइन तास झूम , गूगल क्लासरूम , गूगल डॉक , यू ट्यूब , व्हाट्स अप...

पुन्हा कधीही कोरोना सारख्या महामारीमुळे लेख लिहायची वेळ येऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे आज काय लिहावे आणि काय नको समजेनासे झाले आहे. तरी धाडस करून लिहित आहे. काही चुकले तर समजून घ्यावे ही विनंती.   मार्च महिन्यामध्ये जगात नवीन विषाणू ने धुमाकूळ घातला होता सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शास्त्रज्ञ , संशोधक , मीडिया , नेते , उद्योजक , आणि सामान्य जनता सर्वच नागरिकांना पुढे काय वाहून ठेवले आहे याची कल्पना नव्हती. परिस्थितीचे आकलन होण्याचा आतच लॉकडाउन झाला तेव्हा सुट्टीचा आनंद घेऊया असे समजून काही नागरिक मस्त मजेत होते. हळू हळू परिस्थिती बदलून गंभीर झाली , पण नेमके काय चालू आहे काय करावे आणि काय करू नये याचा अंदाज लागेना. मीडिया मध्ये रोज के भीतीदायक बातमी येऊ लागली कधी विषाणू वर असलेले उपाया येऊ लागले पण शास्त्रीय माहिती सजत नसल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ लागले . अश्या मध्ये रसायनशास्त्राचा विद्यार्थी म्हणून कोरोना विषाणूच्या विरोधात   काही काम करावे असे वाटत होते परंतु संशोधन करण्यासाठी काही मर्यादा होत्या याचे भान होते पण शांत बसून चालणार नाही हे लक्षात आले होते. म्हणून मनातून ठरवले आज या संकटकाळी समजासाठी आप...