Skip to main content

Corona Series Part 36 : कोरोना, आणि प्रतिजैविक (Antibiotics)

Corona Series Part 36
      नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे.

कोरोना, आणि प्रतिजैविक (Antibiotics)
शास्त्राचा सिद्धांतानुसार जगतात स्थिर असे काही नाही, प्रत्येक सजिव, निर्जीव वस्तु मानवी शरीर असो वा जिवाणू, विषाणू असो काही ना काही बदल त्यांच्यात होतच असतात. या विषाणू पासून होणारी बाधा टाळण्याकरिता विविध प्रतिजैविकाचा वापर केला जातो आणि झालेली बाधा कमी होऊन आपल्याला बरे वाटते. परंतु सततच्या प्रतिजैविकाचा वापरमुळे या विषाणू /जिवाणू मध्ये Mutagenic बदल घडू लागतात. अश्यावेळी पुन्हा बाधा झाल्यास रूग्णाला प्रतिजैविकाची अधिक मात्रा द्यावी लागले. अधिक ताकतीची मात्र देण्याचे बरेचसे दुष्परिणाम होऊ शकतात. आणि एक वेळ अशी येते की या प्रतिजैविकाचा वापर करून देखील या विषाणूची रोकथाम करण शक्य होत नाही. कारण सततच्या प्रतिजैविकाचा वापरमुळे विषाणूमध्ये प्रतिजैविकाच्या विरोधात प्रतिरोधक क्षमता तयार होते. एक सर्वे नुसार वर्षाला ७ लाख लोक अश्या प्रतिरोधक क्षमता तयार झालल्याने मृत्यूमुखी पडतात. कोरोना विषाणूच्या या महामारीत मध्ये लोकांचे जीव वाचण्यासाठी आपल्याला देखील जास्तीत जास्त प्रतिजैविकाचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे येणार्‍या काळात आज अस्तीत्वात असलेली प्रतिजैविके निकामी होऊन विषाणूमध्ये प्रतिजैविकाच्या  विरोधात प्रतिरोधक क्षमता तयार होण्याची भीती निर्माण होत आहे. आपल्याला असे वाटेल, प्रतिरोधक क्षमता निर्माण झाली की आपण ही आजच्या प्रतिजैविकाची पुढील आवृत्ती काढू म्हणजे अडचण दूर होईल. पण मित्रांनो ईथेच गडबड होते. कारण पुढील आवृत्ती शोधणं हे वाटते तितके सोपे काम नाही. या मागचे शास्त्र समजून घेण्याचा प्रयत्न करू.
विषाणूमध्ये नैसर्गिक किवा genetic पद्धतीने प्रतिरोधक क्षमता तयार होते. विरोधाचे देखील काही टप्पे आहेत. १] MDR : Multi Drug Resistance २] XDR : Extencive Drug Resistance ३] TDR : Total Drug Resistance i.e Superbugs वैज्ञानिकांना याची कल्पना आधी पासून असल्यामुळे आपल्या भात्या मधील सगळे बाण एकाच वेळी न वापरता काही बाण जपून ठेवले होते, त्याला आपण Antibiotic of last Resort असे म्हणतो. परंतु कोरोना सारख्या माहामारी किवा अन्य काही चुकीच्या गोष्टीमुळे म्हणजे आजच्या या गतिमान जगात प्रत्येकाला लवकर बरे व्हावे असे वाटत असते त्यामुळे आपण साध्य आजाराला देखील प्रतिजैविकाचे उच्च मात्र घेऊ लागलो आहोत त्यामुळे आपल्याकडील प्रतिजैविका सारखे ब्रम्हास्त्र देखील निकामी होण्याची वेळ जवळ येऊ लागली आहे. आपणास माहीत आहे ब्रम्हास्त्र मिळण्या साठी प्रदीर्घ अशी तपश्चर्य करावी लागली होती, त्याच प्रमाणे शास्त्रज्ञांना देखील एक प्रतिजैविक तयार कारण्यासाठी १५ वर्षापेक्षा अधिकचा काळ आणि पैसा खर्च करावा लागतो. असे करताना जर विषाणू mutate झालाच तर सारी मेहनत पाण्यात जाते त्यामुळे विविध औषध कंपन्या देखील प्रतिजैविकी वरील R&D करणे पसंत करत नाहीत. मनुष्याकडे काही मर्यादित प्रतिजैविके शिल्लक आहेत. एकदा जर ती सर्वच छोट्या छोट्या आजारांवर वापरुन सवयीची झालीत तर भविष्यात साधी जखम झाली तरी त्या वरील प्रतिजैविक उपलब्ध नसेल आणि सेपटीक होऊन जीव गमवावा लागेल.

कोरोनाच्या काळात काही प्रगत राष्ट्र चीन, फ्रांस मधील काही संशोधक समूहाने या विषयावर संशोधन केले. The Lancet, Feri, Zhou.; et.al. १९१ कोरोना रुग्णावर अभ्यास केला असता, असे लक्षात आले की कोरोनची बाधा होऊन बरे झाल्यानंतर १५% लोकांना दूयम कोणत्या तरी विषाणू / जिवाणूची बाधा होऊन  ७ ते ८ % लोक मरण पावले आहेत. फ्रांस मध्ये कोरोनाची बाधा झाल्यानंतर Aspergillus बुरशीची बाधा रुग्णांना झाली होती. मागील वर्षी Science & Technology मधील एक रीपोर्ट नुसार यूरोपियन युनियन मधील राष्ट्रामध्ये ३३,००० लोक त्यात ही ११,००० एकट्या ईटली मधील लोक अश्या प्रकारच्या प्रतिरोधक क्षमतेच्या विकासमुळे मृत्यूमुखी पडली. (प्रतिरोधक क्षमतेच्या विकास म्हणजे एका अर्थाने  प्रतिजैविक निकामी होणे).
रोजच्या जीवनातील उदाहरणे म्हणजे १) DDT एक काळचे नोबेल परितोषिक मिळवून देणारे रसायन. या कीटक नाशकामुळे आज मुंग्या देखील मरत नाहीत. २) गूळ तयार करत असताना एक काइल साठी काही ग्राम HSची पावडर घालायची असते परंतु रंग पिवळा धमक येण्या करिता ग्रामच्या ठिकाणी किलो मध्ये हे रसायन वापरले जाते आणि त्याचे दुष्परिणाम मानवी शरीरावर दिसतात. असे कितीतरी रसायने तन/ कीटक नाशके बाजारात आहेत त्याचा तन / किटकावर परिणाम होत नाही, त्याच प्रमाणे औषधामद्धे खूप अशी प्रतिजैविके आहेत त्यांचा कोणत्याही जिवाणू / विषाणू वरील प्रभाव निकामी झाला आहे.
वरील सर्व घटनेतून बोध होतो की असणारे प्रतिजैविकांचा वापर योग्य ठिकाणी आणि मर्यादित करणे गरजेचे आहे. कोरोना सारखा साथीच्या आजारामध्ये भयगंड निर्माण झाल्यामुळे कोरोंनाची बाधा नसणार्‍यानमध्ये प्रतिजैविकेचा भरमसाठ वापर टाळणे गरजेचे आहे. सामान्य सर्दी, खोखला, ताप यामध्ये संयम आणि सहनशीलता आणि डॉक्टरान मार्फत योग्य वैद्यकीय मार्गदर्शन गरजेचे आहे.

प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे     
रसायनशास्त्र विभाग
विवेकानंद कॉलेज कोल्हापूर
https://ajinkya1030.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

Corona Series Part 39 : कोरोना, आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग

Corona Series Part 39       नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोना , आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग जगात असा एक ही देश नसेल जिथे ज्ञानाचा भंडार असणारे भारतीय लोक त्या देशाच्या प्रगतिमध्ये सहभागी नाहीत. कोरोनाच्या लढ्यात तरी हे मागे कशी राहतील. सिरम इंडिया लिमिटेड पुणे स्थित जैव तंत्रज्ञानातील अग्रणी कंपनी आहे यां कंपनीचे वैशिष्ट्य म्हणजे या पूर्वी ही hepatitis, पोलीओ , स्वाइन फ्लू इत्यादि आजारामध्ये लस निर्माण करण्याचे महत्वाचे योगदान आहे. वर्षभरात १.५ अब्ज लसीचे डोस अतिशय माफक दरात तयार करण्याची क्षमता असणारी या कंपनीचे उत्पादन यूरोपियन देशात व संशोधन यूनिट पुणे सारख्या शहरात आहे. भारतामध्ये एक ही नोबेल परितोषिक किवा औषधाचा स्वामित्व हक्क नाही तरीही औषध , लस उत्पादन करण्यात प्रावीण्य , विश्वसनीय नावलौकिक मिळवणारा देश आहे. जावपास ८०% लस आफ्रिका सारख्या देशात पुरवेल जातात. कोरोनाची लस निर्माण करण्यासाठी न्यूयॉर्क मधील codagenic या...

Corona Series Part 56 : कोरोना, आणि ई-शिक्षण

Corona Series Part 56 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. आजचा विषय विस्तृत मांडला आहे.   या विषया बाबतीत आपण आपले मत ब्लॉगवर जरूर कळवावे ही विनंती.     https://ajinkya1030.blogspot.com   कोरोना , आणि ई-शिक्षण मार्च महिन्यापासन कोरोनाचा प्रभाव दिसू लागला शेवटच्या आठवड्यापासून शाळा , कॉलेज लॉकडाउनच्या काळापासून आज पर्यन्त बंद करण्यात आल्या. भितीदायक वातावरणामध्ये १० , १२वी च्या परीक्षा घेण्यात आल्या. शैक्षणिक वर्ष २०१९-२० चे कार्य संपत आले होते परंतु लेखी आणि मौखिक परीक्षा राहिल्या होत्या . आणि आता यूजीसीच्या मार्गदर्शंनानुसार त्या राहूनच जातील. किंवा काही अंशी तात्पुरती योजना राबवून काही ना काही मार्ग काडला जाईल.   नैसर्गिक आपत्ती महापुर , वैश्विक महामारी मधून शैक्षणिक क्षेत्रा समोर नवीन आव्हान उभे राहिले आहे. खाजगी , काही सरकारी शाळा , कॉलेजने देखील तात्पुरती सोय करण्यासाठी ऑनलाइन तास झूम , गूगल क्लासरूम , गूगल डॉक , यू ट्यूब , व्हाट्स अप...

पुन्हा कधीही कोरोना सारख्या महामारीमुळे लेख लिहायची वेळ येऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे आज काय लिहावे आणि काय नको समजेनासे झाले आहे. तरी धाडस करून लिहित आहे. काही चुकले तर समजून घ्यावे ही विनंती.   मार्च महिन्यामध्ये जगात नवीन विषाणू ने धुमाकूळ घातला होता सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शास्त्रज्ञ , संशोधक , मीडिया , नेते , उद्योजक , आणि सामान्य जनता सर्वच नागरिकांना पुढे काय वाहून ठेवले आहे याची कल्पना नव्हती. परिस्थितीचे आकलन होण्याचा आतच लॉकडाउन झाला तेव्हा सुट्टीचा आनंद घेऊया असे समजून काही नागरिक मस्त मजेत होते. हळू हळू परिस्थिती बदलून गंभीर झाली , पण नेमके काय चालू आहे काय करावे आणि काय करू नये याचा अंदाज लागेना. मीडिया मध्ये रोज के भीतीदायक बातमी येऊ लागली कधी विषाणू वर असलेले उपाया येऊ लागले पण शास्त्रीय माहिती सजत नसल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ लागले . अश्या मध्ये रसायनशास्त्राचा विद्यार्थी म्हणून कोरोना विषाणूच्या विरोधात   काही काम करावे असे वाटत होते परंतु संशोधन करण्यासाठी काही मर्यादा होत्या याचे भान होते पण शांत बसून चालणार नाही हे लक्षात आले होते. म्हणून मनातून ठरवले आज या संकटकाळी समजासाठी आप...