Skip to main content

Corona Series Part 20 : कोरोना आणि दुतोंडी चीन


 Corona Series Part 20
      नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. सदर लेखमधील लिखाण अंतरराष्ट्रीय वृतपत्र विविध न्यूज माध्यम वरील असणार्‍या बातमीच्या आधारवरील विश्लेषण आहे ह्या मध्ये कोरोना बाबतील कोणतीही अफवा, जातीय तेढ किवा सरकारी कामात अडथळा निर्माण होईल असा कोणताही मजकूर नाही.
कोरोना आणि दुतोंडी चीन
      बरेच दिवस हा विषय लोकांच्या मनात घोळत आहे. वाचनात, बातम्यामध्ये, सोशल मीडिया, यू ट्यूब वर विडियो च्या माध्यमातून माहिती प्रसिद्ध होत होती. ह्या चीन वर बोलायच झाल तर दोन ते तीन पुस्तकाचे अंक होतील इतके काळे कारनामे ह्या चीनच्या कम्यूनिस्ट सरकारने केले आहेत. दुतोंडी पणा हा चीन च्या कम्यूनिस्ट सरकार मध्ये आहे तेथील नागरिकांचा दोष नाही. असो आपण आज च्या परिस्थितीवर आधी चर्चा करू.
      शी जिनपिंग हे चीन चे राष्ट्रपती आहेतच आणि चीनच्या कम्यूनिस्ट पक्षाचे General Secretary (सरचिटणीस) बनले आहेत तेव्हा पासूनच चीन च्या वागणुकीत प्रचंड बादलाव आला आहे. चीन एक उद्देश समोर ठेऊन त्या मार्गाने वाटचाल करत आहे. संपूर्ण जगावर राज्य करणे महासत्ता बनणे हाच तो ऊदेश आहे. त्याच ध्येयाने चीन ने मागील 20 वर्षा मध्ये स्वःताची अर्थव्यवस्था अधिक बळकट करण्याचा प्रयत्न करत आहे त्यात तिला यश देखील मिळाले आहे ह्यात शंका नाही. ह्या करोना विषाणू मुळे उध्बवलेली परिस्थिति मध्ये ज्या पद्धतीने चीनी सरकारचे वागणे आहे ते पाहून संपूर्ण जगाला विचार करायला भाग पाडले आहे.   
      साधरन पणे ऑक्टोबर 2019 च्या शेवटचा आठवड्या पासून हा करोना विषाणू ची लागण मानसामध्ये होऊ लागली परंतु चीनच्या कम्यूनिस्ट सरकारला समजून यायला नोहेंबर आला परंतु समजल्यावर संपूर्ण जगाला सांगतील ते कम्यूनिस्ट कसले. एव्हाना WHO ला सुधा त्यांनी 31 डिसेंबर ला सूचना दिली. इथेच चीनने विषाणूच्या संक्रमणाची गांभीर्यता सुरवती पासूनच सांगितली असती तर जवळपास 80-90% रुग्ण बचावले असते. नुसतेच चीन सरकार जगापासून आकडे लपवतोय आसन नाही तेथील लोकल अधिकारी सुधा चीन सरकारला चुकीचे आकडे देत होते. त्यामधून देखील जर कोणी ह्या आजाराबदल बोलायचा ठरवलं तर चीन सरकारने त्यांच्यावर निर्बंध लावले होते. आपल्याला कल्पनाही नसेल पण तंत्रज्ञाचा बाबतीत चीन आपल्या पेक्षा नकीच पुढे आहे त्यामुळे त्यांनी प्रतेक नागरिकांचे फेस रीडिंग केले आहे. (यालाच म्हणतात अभिव्यक्ती स्वातंत्र्यची गळचेपी) त्या माध्यमातून चीन सरकार चीन नागरिकांचे सोशल अकाऊंटच सतत मागावो घेत राहते, तिथे सरकार विरोधात बोलूच दिला जात नाही आणि त्यामुळे ह्या आजारावर आवाज उठवणारे लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला गेला.
       WHO ला उशिरा कल्पांना तर दिलीच पूर्ण होवेई राज्य ह्या विषाणूमुळे जगापासून विलग झाले तेव्हा चीन ने ह्या विषाणूची जनुकीय माहिती (genetic information) प्रसारित केली पण तोपर्यंत जे नको व्हयला हवा होता ते झाला होत लाखो लोक जगाचा काना कोपर्‍यात हा विषाणू घेऊन पोहोचले होते. आपण पाहत असाल जानेवारी पासून मार्च च मध्य पर्यन्त जगत चीन ची आलोचना खूप झाली ते पाहून रागावलेल्या चीन ने आपली धारणा बदलली आणि उलट सुलट चर्चा चालू केल्या हा विषाणू आमरिकेच्या सैनी दलाने चीन मध्ये आणला ईत्यादी तसेच विविध देशांना वेगवेगळ्या मेडिकल वस्तूंची सहाय्य करण्याची नौटंकी सुधा चालू केली काही प्रमाणात हा प्रचार करण्यात ते यशवी ठरत आहेत. इतके करून सुधा जे देश चीन वर टीका करायचे त्यांच्यावर आपल्या ताकतीचा गैर वापर करायला सुरवात केली geopolitical दबाव, debt, trade लॉक डाउन अश्या धमक्या वजा विनंती च्या रूपाने चीन ची बदनामी थांबवन्याचे प्रयोग सुरू केले. विषाणू च्या प्रादुरर्भाव मुळे काही देशांनी चीन विमाने पर्यटक नागरिकांना स्वतहाच्या देशात बंदी घातली तेव्हा चीन चे फिलिपाइन मधील राजदूत नि फिलिपाइन सरकारला कळवले जर आपण चीन आणि फिलिपाइन मधला प्रवास बंद केला तर चीन फिलिपाइन कडून कोणताही माल आयात करणार नाही. ह्या सगळ्यातून चीन चे कम्यूनिस्ट सरकार आपले कायदे जगावर लादू पाहत आहे. अमेरिका देखील अश्या काही गोष्टी करत पूर्वी ही केल्या आहेत पण चीन आणि अमेरिका ह्यात फरक हा आहे की अमेरिकेतील लोकशाही आहे काही चुकीच्या गोष्टी होत असतील हे अमारिकन सरकारवर दबाव आणला जातो तसे चीन मध्ये होत नाही कोणत्याही प्रकारची पारदर्शकता चीन मध्ये अस्तीत्वात नाही. 
      जेव्हा असा विघातक विषाणू जगत पसरू लागला, सर्वांना समजू लागला जग जवळपास लॉक डाउन च्या अवस्थेत पोहोचले तेव्हा चीन मात्र ह्या संकटाटुन्न बाहेर पडत चालला आहे. चीन ह्या विषणूचा जन्मदता आणि विस्तारक आहेच पण दुसरीकडे मात्र उदारमतवादी जगातील छोट्या गरीब देशांचा मोठा भाऊ असण्याचा बंधुत्वाचा भाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. असल्या दुतोंडी वागण्याचा डाव जगभारतील लोक नक्कीच ओळखातील.

प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे
रसायनशास्त्र विभाग
विवेकानंद कॉलेज कोल्हापूर

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Corona Series Part 39 : कोरोना, आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग

Corona Series Part 39       नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोना , आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग जगात असा एक ही देश नसेल जिथे ज्ञानाचा भंडार असणारे भारतीय लोक त्या देशाच्या प्रगतिमध्ये सहभागी नाहीत. कोरोनाच्या लढ्यात तरी हे मागे कशी राहतील. सिरम इंडिया लिमिटेड पुणे स्थित जैव तंत्रज्ञानातील अग्रणी कंपनी आहे यां कंपनीचे वैशिष्ट्य म्हणजे या पूर्वी ही hepatitis, पोलीओ , स्वाइन फ्लू इत्यादि आजारामध्ये लस निर्माण करण्याचे महत्वाचे योगदान आहे. वर्षभरात १.५ अब्ज लसीचे डोस अतिशय माफक दरात तयार करण्याची क्षमता असणारी या कंपनीचे उत्पादन यूरोपियन देशात व संशोधन यूनिट पुणे सारख्या शहरात आहे. भारतामध्ये एक ही नोबेल परितोषिक किवा औषधाचा स्वामित्व हक्क नाही तरीही औषध , लस उत्पादन करण्यात प्रावीण्य , विश्वसनीय नावलौकिक मिळवणारा देश आहे. जावपास ८०% लस आफ्रिका सारख्या देशात पुरवेल जातात. कोरोनाची लस निर्माण करण्यासाठी न्यूयॉर्क मधील codagenic या...

पुन्हा कधीही कोरोना सारख्या महामारीमुळे लेख लिहायची वेळ येऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे आज काय लिहावे आणि काय नको समजेनासे झाले आहे. तरी धाडस करून लिहित आहे. काही चुकले तर समजून घ्यावे ही विनंती.   मार्च महिन्यामध्ये जगात नवीन विषाणू ने धुमाकूळ घातला होता सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शास्त्रज्ञ , संशोधक , मीडिया , नेते , उद्योजक , आणि सामान्य जनता सर्वच नागरिकांना पुढे काय वाहून ठेवले आहे याची कल्पना नव्हती. परिस्थितीचे आकलन होण्याचा आतच लॉकडाउन झाला तेव्हा सुट्टीचा आनंद घेऊया असे समजून काही नागरिक मस्त मजेत होते. हळू हळू परिस्थिती बदलून गंभीर झाली , पण नेमके काय चालू आहे काय करावे आणि काय करू नये याचा अंदाज लागेना. मीडिया मध्ये रोज के भीतीदायक बातमी येऊ लागली कधी विषाणू वर असलेले उपाया येऊ लागले पण शास्त्रीय माहिती सजत नसल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ लागले . अश्या मध्ये रसायनशास्त्राचा विद्यार्थी म्हणून कोरोना विषाणूच्या विरोधात   काही काम करावे असे वाटत होते परंतु संशोधन करण्यासाठी काही मर्यादा होत्या याचे भान होते पण शांत बसून चालणार नाही हे लक्षात आले होते. म्हणून मनातून ठरवले आज या संकटकाळी समजासाठी आप...

Corona Series Part 38 : कोरोना, आणि चीनी वैद्यकीय उपकरणे

Corona Series Part 38       नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोना , आणि चीनी वैद्यकीय उपकरणे एखाद्या व्यक्तिच्या मजबूरीचा स्वतच्या फायद्यासाठी कसा उपयोग करून घेता येईल याचे सर्वोत्तम प्रशिक्षण चीनमध्ये मिळते. चीन म्हणजे धोखेबाजी , अविश्वास् याचा अनुभव सर्वांनी घेतला आहे तरी देखिल मजबूरी म्हणून काही व्यवहारीक जुगार चीनशी करावे लागत आहेत. त्यातील एक म्हणजे वैद्यकीय उपकरण खरेदी. नोहेंबर ते फेब्रुवारी च्या दरम्यान चीन मध्ये कोरोना चे संक्रमण जोरावर असल्याने चीन मधील काही प्रांत बंद होते , या विषाणूच्या बाबतीतील माहीत सुरवातीपासूंनच लपवण्यात आल्यामुळे चीन व्यतिरिक्त ईतर जग सुरळीत चालू होते , आणि एकदा हा विषाणू चीन मधून सार्‍या जगात पसरला तेव्हा ईतर देशांची या विषाणू च्या विरोधात लडण्याची तयारी नसल्याने विषाणूचे संक्रमण जलत गतीने पसरू लागले. तेव्हा वैद्यकीय उपकरणे जसे मास्क , तपासणी किट , संरक्षक किट , वेंटीलेटर , ईत्यादी उपकरणाची मागणी आणि ...