Corona Series Part
2
नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या
कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव लक्षात घेऊन social media च्या माध्यमातून जनजागृती करत आहे
आपण प्रथम msg वाचा आणि योग्य वाटल्यास पुढे
पाठवा
इटली आणि भारत
जगात सर्वत्र कोरोना विषाणू फैलावत चालला आहे. प्रगत देश इटली, चीन, अमेरिका, स्पेन, जपान, कोरिया अश्या देशात कोरोना मुळे होणारे मृत्य चे
प्रमाण दिवसागणिक वाढत चालले आहे त्या तुलनेत भारत मात्र बचावला आहे काय कारण असेल
समजून घेऊ
सध्य 140कोटी लोकसंख्या असणाऱ्या चीन मध्ये ह्या विषाणू ने घातलेला थैमान आटोक्यात आले
आहे जवळपास 80000 लोकांना लागण झाली आणि 3000 लोक मृत्युमुखी पडले भारत मात्र 248 बाधित असून फक्त 5 मृत्यू झाल्याचे समजते पण तुलनेने आज इटली
सारखा 6 करोड लोकसंकेचा छोटा पण प्रगतशील देशात मात्र 21000 लोकना लागण होऊन 3400 लोक मरण पावले असे का झाले असेल काही कारणे
1) इटली ला हा पर्यटन वर आधारित देश आहे तेथील सरकारला कोरोना सारख्या रोगाचा
गांभीर्य लक्ष्यात यायला वेळ लागला आणि म्हणूच आंतरराष्ट्रीय विमाने खूप उशीर बंद
केली तोपर्यंत बरेच चीनि नागरिक जे बाधित झाले होते पण कल्पना नसणारे इटली मध्ये
वास्तवास होते त्यांनी हा आजाराच फैलाव न कळात केला.
2) आरोग्य पेक्षा इटली सरकारचे त्यांची इकॉनॉमी आणि GDP लक्ष केंद्रित होते त्यामुळे कोरोना सारखा रुग्ण इटली
मध्ये सापडला तेव्हा त्यांनी पूर्ण लॉक डाउन न करता काही भाग लॉक डाउन केला
त्यामुळे लोक पैसे मिळवायच्या नादात लॉक डाउन असणाऱ्या भागातून सर्व काही सुरळीत
चालू असनाऱ्या भागाकडे वळाले आणि संपूर्ण इटली कोरोना च्या विळख्यात सापडला.आज
भारतात ही तशीच काही परिस्थिती आहे पण केंद्र आणि विविध राज्य सरकारे ह्या
विषाणूच्या बाबतीत इटली पेक्षा अधिक सजग आहे, त्याचमुळे 22 मार्च ला संपूर्ण भारत लॉक डाउन कारण्याचा निर्धार सरकारने केला आहे आणि आपली
सुज्ञ जनता त्याची अंमलबजावणी करेल अशी आशा आहे असे घडल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव
कमी होण्याचा प्रयत्न तर होईलच आणि सरकारी यंत्रणा पोलीस डॉक्टर टेस्टिंग लॅब सफाई
कामगार वर असणारा ताण पण अल्प प्रमाणात कमी होईल
3) आता जरा सांख्यिकी च्या माध्यमातून जाणून घेऊ
कोरोना विषाणू हा मनुष्याचा
वयानुसार कमी आधी प्रमाणात लागण करतो एक सर्वे
नुसार
वय
मृत्यू झालेले प्रमाण
10 ते 39 0.2%
40 ते 49 0.4%
50 ते 59 1.3%
60 ते 69 3.6%
70 ते 79 8.0%
80 च्या पुढे 14.8%
वरील डेटा नुसार रोगप्रतिकारक
क्षमता कमी असणाऱ्या लोकांमध्ये लागण होऊन मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. इटली हा
विकसित देश असल्यामुळे तेथील average life हे भारताच्या तुलनेने जास्ती आहे इटली मध्ये life expectancy 82 -83 वर्ष इतके आहे इटली मध्ये
त्यांच्या लोकसंख्येच्या 23% लोक हे 65 वर्ष आणि 60% लोक हे 40 वर्षा पेक्षा जास्ती आयु असणारं आहे म्हणूच इटली मध्ये मृत्यूचे प्रमाण वाढले
आहे आणि जे मृत्युमुखी पडले आहे त्यातील बहुल लोक हे 65 वर्ष पेक्षा जास्त असणारे आहेत तेथील सरकारला समोर
मृतदेह ची विल्हेवाट लावण्याचं मोठा प्रश्न निर्माण झाला आहे इटली ची सेना
मृतदेहाची विल्हेवाट लावताना दिसत आहे
भारत हा तरुणांचा देश 137 करोड लोकांमधील 50% लोकसंख्या ही 25 वर्ष आणि 65% लोकसंख्या ही 35 पेक्षा कमी आहे, तर average life 29वर्ष life expectancy 68-69 वर्ष इतके आहे म्हणजेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होनाऱ्या टप्यात भारतीय लोक इटली,चीन च्या तुलनेत कमी आहे
5) सर्व राज्य केंद्र सरकार ला कोरोनाचा समजलेला धोका व आपल्या सारखे सुजाण
नागरिक ह्या कोरोना सारखाय संकटावर मत करू शकू आणि आपला इटली होण्या पासून बचाव
करू
सरकारचे आदेश तंतोतंत पालन करून
स्वतःची काळजी घ्या बाऊ करून घेऊ नका.
प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे
रसायनशास्त्र विभाग
विवेकानंद कॉलेज कोल्हापूर
Sarvanpeksha vegla aapla bharat desh mahan
ReplyDelete