Corona Series Part
14
नमस्कार
मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात
घेऊन social media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न
करत आहे.
कोरोना आणि Plasma Transmission Therapy
आज
अखेर 2,33,599 कोरोंना पासून बाधित झालेले रुग्ण
बरे झाले आहेत अजूनही 11,31, 713 लोक मात्र कोरणोचा विषाणू
पासून अजूनही बाधित आहेत. हा कोरोंना विषाणू विकसीत (Modified) जरी असला तरी 2002 साली आलेल्या SARS, MERS या विषाणूशी साधर्म्य राखतो हे आज
संशोधक आणि शास्त्रज्ञना उमगल आहे आणि म्हणूनच पूर्वी वापरत असलेल्या काही
ट्रीटमेंट ची ट्रायल आज ते करोना वायरस वर करू पाहत आहेत. Plasma Transmission Therapy ही तशी फार जुनी प्रक्रिया आहे. फार वर्षा पूर्वी Diphtheria, Tetanes या सारख्या आजारावर vaccine बनवण्यासाठी वापरण्यात आली आणि स्पॅनिश
फ्लू मध्ये सुद्धा ह्या प्रक्रिया चए वापर केला गेला, हली च्या काळात 2009 साली स्वाइन फ्लू साठी ह्या Therapy च वापर करण्यात आला. बरेच
से शोधनिबंध देखील प्रसिद्ध झालेत (Convalescent Plasma Treatment Reduced
Mortality in Patients with Several Pandemic Influenza H1N1 2009 virus
infection) हा त्यातील्च एक शोधनिबंध आहे. नुकताच Journal of American Medicine मध्ये चीन मधील Shenzhen हॉस्पिटलमधील डॉक्टरांचा समूहाने दीनांक 27 मार्च 2020 रोजी एक शोधनिबंध प्रसिद्ध
केला त्या मध्ये चीन मधील 5 रुग्णावर त्यांनी ह्या प्रक्रियाचा उपाय केला आणि
त्यांना चांगले रिजल्ट मिळाले आणि तेव्हा पासून ह्या प्रक्रिये ल महत्व प्राप्त
झाले आहे.
आज
आपण प्लाजमा म्हणजे काय ते आधी बघू माणसाच्या शरीरात लाल रंगाचे रक्त असत. रक्त हे
विविध घटकापासून बनले त्यात जवळपास एक पिवळ्या रंगचा घटक असतो (55% including water) तो म्हणजे
प्लाजमा आणि पांढर्या पेशी आणि प्लटेलेट जवळपास < 1% तसेच ज्यामुळे रक्त लाल रंगाचे दिसते त्या लाल
रक्त पेशी (45%) अश्या प्रमाणात घटक असतात. साधारण विद्यार्थी किवा समामया माणूस
प्लाजमा आणि serum हे दोन्ही घटक एकच समजतो त्यामध्ये थोडासा फरक आहे जो की प्लाजमा मध्ये रक्त
गोठवणारे घटक सुद्धा असतता मात्र serum मध्ये हे घटक नसतात.
सध्या plasma transmission therapy देखील करोना विषाणू च्या ट्रीटमेंट
साठी वापरण्यात येत आहे. मुळात त्याला Convalescent plasma
transmission therapy अस म्हणातला जाता Convalescent i.e recovery from illness. म्हणजे जेव्हा रुग्णाल कोरोना च संसर्ग होतो त्या नंतर आपला शरीर नसर्गिक
रित्या ह्या विषाणूच्या विरोधात anti-bodies तयार करतता. आणि रुग्ण हळू हळू बरा होत असतो (वाचा corona series part 13). रुग्ण बरा जरी झाला तरी तो
लगेच उद्या उठून कामाल जाऊ शक्त नाहीत तेव्हा चा काळ म्हणजे Convalescent ज्या वेळी रुग्ण बरा झाला असला
तरी शरीर पुन्हा नव्याने काम करायला जायच्या आधी recovery टाइम घेतो तेव्हा जर त्या व्यक्ति कडून प्लाजमा
घेतला तर त्यात आपणास antibodies च प्रमाण योग्य प्रमानात आढळून येतं.
ह्याच
नैसर्गिक प्रक्रियेचा आपणा फायदा घेतो आणि ह्या रुग्णाचा कडून आपण त्यांचं रक्त
घेतो आणि त्यातून प्लाजमा वेगळा केला जातो त्याला Plasmapheresis असे म्हणातात. एकदा प्लाजमा वेगळा
केला की त्याच्या सपूर्ण टेस्ट कराव्या लागतात अगदी रूग्णाला कोणते जुने आजार आहेत
का जसा की मधुमेह, एचआयव्ही. त्यामुळे ह्या प्रक्रियेसाठी योग्य प्लाजमा देणारे रुग्णाची संख्या
रोडवते. तसेच प्लाजमा वेगळा करना इत्यादि प्रक्रिया फार सोपूय नाहीत हा एक त्याचा
नकारात्मक भाग आहे. पण ह्या सगळीअ अडचणी वर मत करून जो प्लाजमा मिळतो तो आपण करोना
ने पीडित असलेय व्यक्तीच्या शरीरात घालतो आणि त्याची रोगप्रतिकार शक्ति वाढवून
त्याला करोना पासून होणारे किवा झालेले
संक्रमण रोखून धरतो. ह्या प्रक्रियाचे फायदे आणि तोटे जारी असले तरी ही प्रक्रिया
म्हणजे करोना वरचा शेवटचा उत्तर नाही अजूनही शास्त्रज्ञ vaccine शोधण्याचा प्रयत्न करत आहेत . ह्या vaccine च शोध लागे पर्यन्त मात्र अश्या
प्रक्रिया माणसाचे जीव वाचवत राहतील. उद्या BCG vaccine आणि कोरोंना ह्या विषयवार माहिती
घेऊ.
प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे
रसायनशास्त्र विभाग
विवेकानंद कॉलेज कोल्हापूर
Comments
Post a Comment