Skip to main content

Corona Series Part 69 : कोरोना, आणि T-cell चे कार्य

Corona Series Part 69

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/

कोरोना, आणि T-cell चे कार्य

शरीरामध्ये कोणत्याही विषाणू, जिवाणू किंवा अन्य कश्याचे ही आक्रमण झाले तर शरीरातील रोगप्रतिकारक शक्तिच्या सहाय्याने परकीय आक्रमनाचा हल्ला परतवून लावला जातो. रोगप्रतिकारक शक्ति दोन प्रकारच्या असतात innate आणि adaptive या संदर्भात आपण भाग 13 मध्ये चर्चा केली आहे. यामधील innate रोगप्रतिकारक शक्ति पूर्वी पासून शरीररामद्धे असते जी लगेच प्रतिकार करते जसे त्वचा, म्यूकस, ईत्यादी त्वरित विषाणूला प्रतिरोध करते. (Adaptive) अनुकूल रोगप्रतिकारक शक्ति त्वरित प्रतिक्रियेत येत नाही सर्वप्रथम विषाणूला ओळखले जाते आणि नियोजन पूर्वक विषाणूवर हल्ला केला जातो. करोना, सार्स, मर्स सारख्या नवीन विषाणूशी सामना करत असताना शरीर लगेच प्रतिक्रिया देत नाही. अनुकूल रोगप्रतिकारक शक्ति मधील 2 कमांडर म्हणजे T-Cell, BCell चे वैशिट्य म्हणजे एकदा बाधा झाली तरी त्या विषाणूची ओळख कायम स्वरूपी लक्षात ठेवली जाते आणि पुन्हा संक्रमण झाले, तरी विषाणूला मारले जाते त्यास phaygocytosis म्हणततात.

T-Cellsचा कोरोना सोबतच्या लढ्या मधील सहभाग या बाबतीत नुकतच cell या नामांकित शास्त्रीय जर्नल मध्ये अल्बा गृफोणी यांच्या समूहाने संशोधन प्रसिद्ध केले. T-Cellsचे प्रमुख २-प्रकार आहेत. Helper आणि cytotoxic T-Cells. Helper T-Cells म्हणजे जसा महाभारतामध्ये श्रीकृष्ण तसे Helper T-Cells, देखील प्रत्यक्ष विषाणू बरोबर लढा देत नाहीत परंतु शरीराला लढा देण्यासाठी प्रेरणा देतात. या पेशींचे काम चांगले असल्यास बाधा झाली तरी आजार जास्ती बळावत नाही. cytotoxic T-Cells phaygocytosis पद्धती नुसार विषाणूला पेशीचा बाहेर ओळखतो आणि मारून टाकतो.

B-Cellsचे प्रमुख कार्य म्हणजे शरीरामध्ये विषाणूच्या विरोधात अॅंटी बोडीज तयार (IgG, IgM, IgA, IgE, IgD) करणे. B-Cells हे विषाणूच्या पृष्ठभागची ओळख करून घेतात.

कोरोना विषाणू बाबतीत या दोन्ही पेशी विषाणूला लक्ष करतता का हे पहिले गेले. अभ्यासातून लक्षात आले, संक्रमण असणारे आणि नसणारे या दोन्ही व्यक्तिमध्ये कोरोंना विषाणूच्या विरोधात या पेशी काम करत आहेत.  अभ्यासामध्ये जे लोक बरे झाले त्याच्या पेशी विषाणू समोर उभे केल्या असता या पेशी विषाणूच्या spick प्रोटीनला जाऊन जोडले जातात आणि जवळपास ७०% नमुन्यामध्ये या पेशी आढळल्या आहेत. जे लोक कधीही बाधित झाले नाही त्यांचामध्ये देखील ३४% व्यक्ति मध्ये या पेशी कोरोना विषाणूशी लढण्यासाठी सक्षम असल्याचे दिसून आले. काही व्यक्तींचे नमुने हे २०१५-२०१८ पासून गोळा केले होते तेव्हा अशी कोणतीही वैश्विक महामारी नसताना देखील मानवी शरीर कोरोना विषाणूशी दोन हात करण्याची क्षमता बाळगतो. म्हणजेच मानवजातीला कोरोनाची कल्पना नसताना मानवी शरीर मात्र दुसर्‍या प्रकारच्या कोरोना विषाणूला ओळखून होते आणि म्हणूनच T-Cells या नवीन प्रकारच्या कोरोंना विषाणूच्या spick प्रोटीनला जाऊन जोडले जातात. याचा अर्था असा नाही ज्या लोकांच्या शरीरात T-Cells प्रतिसाद देत आहेत ते लोक कायम स्वरूपी कोरोंना पासून सुरक्षित आहेत परंतु असे लोक या विषाणू पासून (less viral lode) लवकर आजारी पडणार नाहीत एका अर्थाने रोगप्रतिकार शक्ति अधिक सक्षम आहे. विषाणूची संख्या जास्त झाली तर मात्र आजार बळावेल. या संशोधनामुळे लस निर्मितीला चालना मिळणार आहे, कारण प्रामुख्याने सार्‍या लस या B-Cells मधील अॅंटीबॉडीच्या अनूशगाने बनवल्या जात आहे परंतु आता T-Cells ला लक्ष करून एखादी लस बनवता येती का हे पहावे लागेल.

प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे,

रसायनशास्त्र विभाग

विवेकानंद कॉलेज कोल्हापूर


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Corona Series Part 39 : कोरोना, आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग

Corona Series Part 39       नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोना , आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग जगात असा एक ही देश नसेल जिथे ज्ञानाचा भंडार असणारे भारतीय लोक त्या देशाच्या प्रगतिमध्ये सहभागी नाहीत. कोरोनाच्या लढ्यात तरी हे मागे कशी राहतील. सिरम इंडिया लिमिटेड पुणे स्थित जैव तंत्रज्ञानातील अग्रणी कंपनी आहे यां कंपनीचे वैशिष्ट्य म्हणजे या पूर्वी ही hepatitis, पोलीओ , स्वाइन फ्लू इत्यादि आजारामध्ये लस निर्माण करण्याचे महत्वाचे योगदान आहे. वर्षभरात १.५ अब्ज लसीचे डोस अतिशय माफक दरात तयार करण्याची क्षमता असणारी या कंपनीचे उत्पादन यूरोपियन देशात व संशोधन यूनिट पुणे सारख्या शहरात आहे. भारतामध्ये एक ही नोबेल परितोषिक किवा औषधाचा स्वामित्व हक्क नाही तरीही औषध , लस उत्पादन करण्यात प्रावीण्य , विश्वसनीय नावलौकिक मिळवणारा देश आहे. जावपास ८०% लस आफ्रिका सारख्या देशात पुरवेल जातात. कोरोनाची लस निर्माण करण्यासाठी न्यूयॉर्क मधील codagenic या...

Corona Series Part 56 : कोरोना, आणि ई-शिक्षण

Corona Series Part 56 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. आजचा विषय विस्तृत मांडला आहे.   या विषया बाबतीत आपण आपले मत ब्लॉगवर जरूर कळवावे ही विनंती.     https://ajinkya1030.blogspot.com   कोरोना , आणि ई-शिक्षण मार्च महिन्यापासन कोरोनाचा प्रभाव दिसू लागला शेवटच्या आठवड्यापासून शाळा , कॉलेज लॉकडाउनच्या काळापासून आज पर्यन्त बंद करण्यात आल्या. भितीदायक वातावरणामध्ये १० , १२वी च्या परीक्षा घेण्यात आल्या. शैक्षणिक वर्ष २०१९-२० चे कार्य संपत आले होते परंतु लेखी आणि मौखिक परीक्षा राहिल्या होत्या . आणि आता यूजीसीच्या मार्गदर्शंनानुसार त्या राहूनच जातील. किंवा काही अंशी तात्पुरती योजना राबवून काही ना काही मार्ग काडला जाईल.   नैसर्गिक आपत्ती महापुर , वैश्विक महामारी मधून शैक्षणिक क्षेत्रा समोर नवीन आव्हान उभे राहिले आहे. खाजगी , काही सरकारी शाळा , कॉलेजने देखील तात्पुरती सोय करण्यासाठी ऑनलाइन तास झूम , गूगल क्लासरूम , गूगल डॉक , यू ट्यूब , व्हाट्स अप...

पुन्हा कधीही कोरोना सारख्या महामारीमुळे लेख लिहायची वेळ येऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे आज काय लिहावे आणि काय नको समजेनासे झाले आहे. तरी धाडस करून लिहित आहे. काही चुकले तर समजून घ्यावे ही विनंती.   मार्च महिन्यामध्ये जगात नवीन विषाणू ने धुमाकूळ घातला होता सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शास्त्रज्ञ , संशोधक , मीडिया , नेते , उद्योजक , आणि सामान्य जनता सर्वच नागरिकांना पुढे काय वाहून ठेवले आहे याची कल्पना नव्हती. परिस्थितीचे आकलन होण्याचा आतच लॉकडाउन झाला तेव्हा सुट्टीचा आनंद घेऊया असे समजून काही नागरिक मस्त मजेत होते. हळू हळू परिस्थिती बदलून गंभीर झाली , पण नेमके काय चालू आहे काय करावे आणि काय करू नये याचा अंदाज लागेना. मीडिया मध्ये रोज के भीतीदायक बातमी येऊ लागली कधी विषाणू वर असलेले उपाया येऊ लागले पण शास्त्रीय माहिती सजत नसल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ लागले . अश्या मध्ये रसायनशास्त्राचा विद्यार्थी म्हणून कोरोना विषाणूच्या विरोधात   काही काम करावे असे वाटत होते परंतु संशोधन करण्यासाठी काही मर्यादा होत्या याचे भान होते पण शांत बसून चालणार नाही हे लक्षात आले होते. म्हणून मनातून ठरवले आज या संकटकाळी समजासाठी आप...