Skip to main content

Corona Series Part 66: कोरोना, आणि स्लोव्हेनिया

Corona Series Part 66

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. https://ajinkya1030.blogspot.com/

 

कोरोना, आणि स्लोव्हेनिया

भारतामध्ये कोरोना विषाणूमुळे सुरवातीपासूनच भितीचे वातावरण होतेच तसेच आर्थिक घडी देखील विसकटली असल्याने सर्वच वर्गामधील नागरिक चिंतेत दिसत आहेत, जागतिक पातळीवर हळू हळू विषणूचा प्रभाव कमी होऊ लागला आहे तसेच काही देशातील आरोग्य सेवा विषाणूशी लढा देण्यासा सज्ज झाल्या आहेत त्यामुळे विविध देशातील सध्याची परिस्थिती समजली तर मनोबल वाढून आपली भिती कमी होईल. चीनमध्ये सध्या सार्‍या गोष्टी पूर्वव्रत झाल्या आहेत चीन नंतर युरोपमध्ये या विषाणू ने धुमाकूळ घातला होता. ईथे देखील परिस्थिती नियंत्रणात येत आहे. २१ लाख लोकसंख्या असणारा आणि इटली, ऑस्ट्रिया, हंगेरी, क्रोएशिया बरोबर सीमा असणार्‍या तंत्रज्ञानात प्रगत (AI), नाटो, आणि यूरोपियन यूनियनचा सदस्य असणारा स्लोव्हेनिया देश हा कोरोनामुक्त होणारा जगातील पहिला देश बनला आहे. ईटलीच्या शेजारी असून देखील कोरोनामुक्त होणे हे विशेष म्हंटले पाहिजे. १३ मार्च रोजी शेवटचा रुग्ण आढळला असून १४६७ रुग्ण आणि फक्त १०३ मृत्यू आतापर्यंत झाले. या मुळे युरोप खंडात एक दिलासदायक आणि सकारात्मक वातावरण तयार होण्यास मदत होत आहे. छोटा देश असला तरी कोरोनाचे संक्रमन रोखण्यात यश मिळवले आणि त्यामुळे युरोपमधील ईतर देश या देशाचे अनुकरण करत आहेत. युरोप खंड कोरोनामुक्त होण्यासाठी १ पाऊल पुढे जात असताना आशिया खंडातील काही देश मात्र अजूनही या महामारीसाठी पूर्णपने तयार झाले नाहीत. उत्तर कोरिया सारखे देश अजूनही कोरणाचे संकट मानायला तयार नाहीत. या मुळे आशिया खंडामध्ये सुरळीत आर्थिक घडामोडी होण्यास विलंब होऊ शकतो.

जागतील ३री मोठी अर्थव्यवस्था असणारा जपानची अर्थव्यवस्था देखील अडचणीत आली असताना स्लोव्हेनिया देशामधील सर्व आर्थिक घडामोडी आता सुरू झाल्या यामुळे जागतिक अर्थव्यवस्थे मध्ये देखील एक सकारात्मकता दिसून येऊ शकते कारण स्लोव्हेनिया देश तंत्रज्ञानात अतिशय प्रगत आहे, त्यामुळे ईतर देश देखील देशवार अवलंबून आहे. भारत देखील तंत्रज्ञानाच्या बाबतित स्लोव्हेनियाशी व्यवहार करतो वार्षिक ३००-४०० दशलक्ष व्यवहार केला जातो. भारत आणि स्लोव्हेनिया देशाचे आंतर्राष्ट्रीय संबंध देशील चांगले असून संयुक्त राष्ट्रमध्ये कायमस्वरूपी सदस्य होण्यासाठी भारताच्या बाजूने मतदान करण्यास देखील हा देश सकारात्मक आहे. स्लोव्हेनिया देश कोरोनामुक्त झाला आहे काही ही सकारात्मक बाब आपल्याला देखील दिलासा देऊन जाईल भरातमध्ये देखील एके एक राज्य हळू हळू कोरोनामुक्त होण्यासाठी नियमांचे तंतोतंत पालन करू आणि मनात सकारात्मकता बाळगू.

 

प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे,

रसायनशास्त्र विभाग,

विवेकानंद कॉलेज कोल्हापूर

https://ajinkya1030.blogspot.com


Comments

  1. Dr. Ajinkya your all posts regarding COVID 19 is very very informative and well drafted. I salute to your work and efforts taken for sending right information.

    ReplyDelete
  2. Nice information sir 👍👍 thanks sir 👍👍

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Corona Series Part 39 : कोरोना, आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग

Corona Series Part 39       नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोना , आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग जगात असा एक ही देश नसेल जिथे ज्ञानाचा भंडार असणारे भारतीय लोक त्या देशाच्या प्रगतिमध्ये सहभागी नाहीत. कोरोनाच्या लढ्यात तरी हे मागे कशी राहतील. सिरम इंडिया लिमिटेड पुणे स्थित जैव तंत्रज्ञानातील अग्रणी कंपनी आहे यां कंपनीचे वैशिष्ट्य म्हणजे या पूर्वी ही hepatitis, पोलीओ , स्वाइन फ्लू इत्यादि आजारामध्ये लस निर्माण करण्याचे महत्वाचे योगदान आहे. वर्षभरात १.५ अब्ज लसीचे डोस अतिशय माफक दरात तयार करण्याची क्षमता असणारी या कंपनीचे उत्पादन यूरोपियन देशात व संशोधन यूनिट पुणे सारख्या शहरात आहे. भारतामध्ये एक ही नोबेल परितोषिक किवा औषधाचा स्वामित्व हक्क नाही तरीही औषध , लस उत्पादन करण्यात प्रावीण्य , विश्वसनीय नावलौकिक मिळवणारा देश आहे. जावपास ८०% लस आफ्रिका सारख्या देशात पुरवेल जातात. कोरोनाची लस निर्माण करण्यासाठी न्यूयॉर्क मधील codagenic या...

Corona Series Part 56 : कोरोना, आणि ई-शिक्षण

Corona Series Part 56 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. आजचा विषय विस्तृत मांडला आहे.   या विषया बाबतीत आपण आपले मत ब्लॉगवर जरूर कळवावे ही विनंती.     https://ajinkya1030.blogspot.com   कोरोना , आणि ई-शिक्षण मार्च महिन्यापासन कोरोनाचा प्रभाव दिसू लागला शेवटच्या आठवड्यापासून शाळा , कॉलेज लॉकडाउनच्या काळापासून आज पर्यन्त बंद करण्यात आल्या. भितीदायक वातावरणामध्ये १० , १२वी च्या परीक्षा घेण्यात आल्या. शैक्षणिक वर्ष २०१९-२० चे कार्य संपत आले होते परंतु लेखी आणि मौखिक परीक्षा राहिल्या होत्या . आणि आता यूजीसीच्या मार्गदर्शंनानुसार त्या राहूनच जातील. किंवा काही अंशी तात्पुरती योजना राबवून काही ना काही मार्ग काडला जाईल.   नैसर्गिक आपत्ती महापुर , वैश्विक महामारी मधून शैक्षणिक क्षेत्रा समोर नवीन आव्हान उभे राहिले आहे. खाजगी , काही सरकारी शाळा , कॉलेजने देखील तात्पुरती सोय करण्यासाठी ऑनलाइन तास झूम , गूगल क्लासरूम , गूगल डॉक , यू ट्यूब , व्हाट्स अप...

पुन्हा कधीही कोरोना सारख्या महामारीमुळे लेख लिहायची वेळ येऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे आज काय लिहावे आणि काय नको समजेनासे झाले आहे. तरी धाडस करून लिहित आहे. काही चुकले तर समजून घ्यावे ही विनंती.   मार्च महिन्यामध्ये जगात नवीन विषाणू ने धुमाकूळ घातला होता सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शास्त्रज्ञ , संशोधक , मीडिया , नेते , उद्योजक , आणि सामान्य जनता सर्वच नागरिकांना पुढे काय वाहून ठेवले आहे याची कल्पना नव्हती. परिस्थितीचे आकलन होण्याचा आतच लॉकडाउन झाला तेव्हा सुट्टीचा आनंद घेऊया असे समजून काही नागरिक मस्त मजेत होते. हळू हळू परिस्थिती बदलून गंभीर झाली , पण नेमके काय चालू आहे काय करावे आणि काय करू नये याचा अंदाज लागेना. मीडिया मध्ये रोज के भीतीदायक बातमी येऊ लागली कधी विषाणू वर असलेले उपाया येऊ लागले पण शास्त्रीय माहिती सजत नसल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ लागले . अश्या मध्ये रसायनशास्त्राचा विद्यार्थी म्हणून कोरोना विषाणूच्या विरोधात   काही काम करावे असे वाटत होते परंतु संशोधन करण्यासाठी काही मर्यादा होत्या याचे भान होते पण शांत बसून चालणार नाही हे लक्षात आले होते. म्हणून मनातून ठरवले आज या संकटकाळी समजासाठी आप...