Skip to main content

Corona Series Part 39 : कोरोना, आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग


Corona Series Part 39
      नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे.

कोरोना, आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग
जगात असा एक ही देश नसेल जिथे ज्ञानाचा भंडार असणारे भारतीय लोक त्या देशाच्या प्रगतिमध्ये सहभागी नाहीत. कोरोनाच्या लढ्यात तरी हे मागे कशी राहतील. सिरम इंडिया लिमिटेड पुणे स्थित जैव तंत्रज्ञानातील अग्रणी कंपनी आहे यां कंपनीचे वैशिष्ट्य म्हणजे या पूर्वी ही hepatitis, पोलीओ, स्वाइन फ्लू इत्यादि आजारामध्ये लस निर्माण करण्याचे महत्वाचे योगदान आहे. वर्षभरात १.५ अब्ज लसीचे डोस अतिशय माफक दरात तयार करण्याची क्षमता असणारी या कंपनीचे उत्पादन यूरोपियन देशात व संशोधन यूनिट पुणे सारख्या शहरात आहे. भारतामध्ये एक ही नोबेल परितोषिक किवा औषधाचा स्वामित्व हक्क नाही तरीही औषध, लस उत्पादन करण्यात प्रावीण्य, विश्वसनीय नावलौकिक मिळवणारा देश आहे. जावपास ८०% लस आफ्रिका सारख्या देशात पुरवेल जातात. कोरोनाची लस निर्माण करण्यासाठी न्यूयॉर्क मधील codagenic या अमेरिकन कंपनी बरोबर मिळून कार्य करत आहे. तसेच सिरमचे ऑक्सफोर्ड सारख्या बर्‍याच विद्यापीठा बरोबर लस निर्मिती मध्ये सक्रिय सहभाग आहे.
लस ही फक्त अश्या लोकांना देणात येते, ज्या व्यक्तिना या पूर्वी कोरोनाची लागण झाली नाही. लस बनवताना कोरोनाचे विषाणूच वापरले जातील फरक एवडाच असेल की मानसाच्या शरीराला त्रास देणारा विषाणू मधला भाग अतिशय कमजोर केला जातो. जेव्हा ही लस शरीरात जाईल त्याच बरोबर रोगप्रतिकारक शक्ति या विषाणूला ओळखून आवशक्य असणारी अॅंटीबॉडीज शरीरात निर्माण करून ठेवतील, भविष्यात जेव्हा कोरोनाची लागण होईल त्या वेळी आपले शरीर लगेच अॅंटीबॉडीज तयार करू शकेल.
सेप्टेंबर ते डिसेंबर २०२० पर्यन्त या लसचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. पण ही लस देखील १००% कोरोना पासून बाचव करेल असे म्हणता येणार नाही कंपांनीच्या शास्त्रज्ञाचा म्हणयानुसार ७०-८०% लस कामास येईल. ही लस सामान्या लोकांच्या खिशाला परवडेल अश्या किमतीत विकली जाणार आहे १०००/ डोस. असे असले तरीही लस निर्माण झाल्यावर भारत सरकारने देखील सरकारी यंत्रणेचा वापर करून लस कमीत कमी रक्कमेत जासित जास्त नागरिकान पर्यन्त पोहोचवावी. कंपांनीच्या या कार्यास लवकर यश मिळो हीच सदीच्छा.
प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे     
रसायनशास्त्र विभाग
विवेकानंद कॉलेज कोल्हापूर

Comments

  1. Nice information sir 👍 thanks sir 👍

    ReplyDelete
  2. Thanks sir 👍 nice information sir 👍👍

    ReplyDelete
  3. भारतीय लोक सर्वच क्षेत्रात अग्रणी आहे पण सर्व लोकांना भारतात आपल ज्ञान आणि व्यक्ती यांची किंमत नाही म्हणून तर भारत सोडून जातात

    ReplyDelete

Post a Comment