Skip to main content

Corona Series Part 38 : कोरोना, आणि चीनी वैद्यकीय उपकरणे


Corona Series Part 38
      नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे.

कोरोना, आणि चीनी वैद्यकीय उपकरणे
एखाद्या व्यक्तिच्या मजबूरीचा स्वतच्या फायद्यासाठी कसा उपयोग करून घेता येईल याचे सर्वोत्तम प्रशिक्षण चीनमध्ये मिळते. चीन म्हणजे धोखेबाजी, अविश्वास् याचा अनुभव सर्वांनी घेतला आहे तरी देखिल मजबूरी म्हणून काही व्यवहारीक जुगार चीनशी करावे लागत आहेत. त्यातील एक म्हणजे वैद्यकीय उपकरण खरेदी. नोहेंबर ते फेब्रुवारी च्या दरम्यान चीन मध्ये कोरोना चे संक्रमण जोरावर असल्याने चीन मधील काही प्रांत बंद होते, या विषाणूच्या बाबतीतील माहीत सुरवातीपासूंनच लपवण्यात आल्यामुळे चीन व्यतिरिक्त ईतर जग सुरळीत चालू होते, आणि एकदा हा विषाणू चीन मधून सार्‍या जगात पसरला तेव्हा ईतर देशांची या विषाणू च्या विरोधात लडण्याची तयारी नसल्याने विषाणूचे संक्रमण जलत गतीने पसरू लागले. तेव्हा वैद्यकीय उपकरणे जसे मास्क, तपासणी किट, संरक्षक किट, वेंटीलेटर, ईत्यादी उपकरणाची मागणी आणि उपलब्ध मधील तफावत पाहता या ऊपकरणाची आयात करणे महत्वाचे झाले होते. आयात करायचीच आहे तर वैद्यकीय दृष्ट्या प्रगत देशाकडून ही उपकरणे घेता आली असती परंतु दुर्दैव असे हेच देश या विषाणूच्या जाळ्यात जाऊन अडकले होते. अश्या परिस्थिती मध्ये पुरवठा साखळीचा केंद्र बिन्दु असणारा ड्रॅगन हा एकमेव पर्याय शिल्लक राहिला होता.
नेदरलँड सारख्या यूरोपियन देशाने १३ लक्ष मास्क चीन मधून आयात करून वितरित केले परंतु त्यातील ६ लक्ष मास्क मध्ये फिल्टरचे कार्य योग्य होत नव्हते तसेच काही चेर्‍यावर योग्या रित्या बसत नव्हते. ड्रॅगन समोर सारे सारखेच मित्र देश पाकिस्तान असो वा व्यापारी युद्धा मधील अमेरिका असो म्हणूनच पाकिस्तान मध्ये मदत म्हणून पाठवलेले माक्स हे होजीअरी सारख्या कापडा पासून बनवून पाठवले गेले. बेल्ट अँड रोड मधील खूप सार्‍या देशात अशी निकृष्ट दरज्याची मदत केली गेली आहे. स्पेन मधील ६०,००० तपासणी किट खराब निघाले. अशीच घटना स्लोवाकिया, चेक रिपब्लिक या देशात घडल्या आहेत. 
१६ एप्रिल २०२० रोजी चीन कडून आयात केलेले ५ लक्ष अॅंटी बॉडीझ किट भारतता मध्ये दाखल झाले. भारत सरकारला चीन सरकार मार्फत या चीनी कंपनी आणि उपकरणाची हमी देण्यात आली होती. या धर्तीवर खरेदी केलेली किट विविध राज्यात वितरित करण्यात आली परंतु राजस्थान, केरळ आणि तमिळनाडू या राज्यामध्ये हे किट चुकीचे निकाल देत असयची निष्पन्न झाले. एकट्या राजस्थानमध्ये अॅंटीबॉडी किटची अचूकता पाहण्याकरिता  १७० कोरोना बाधित रूग्णांच्या पुन्ह तपासणी केली परंतु त्यात फक्त ५.१% बाधित असल्याचा निकाल या किट ने दिला. ईतर  ठिकाणी या अॅंटीबॉडी किट ची अचूकता ६% ते ७१% च्या दरम्यान दिसून आली. या घटनेमुळे किट खराब असल्याचे लक्षात आले. तरीही विषयाच महत्व समजून ICMR ने त्वरित २ दिवस किटचा वापर थांबवन्याचे निर्देश देऊन. स्वतः आयसीएमआर या किटची तपासणी करीत आहे. त्यामुळे तूर्तास तरी कोरोनासाठी पुन्हा PCR / NAT या सारख्या प्रमुख परंतु खर्चीक, वेळ लागणार्‍या तपासणीवर अवलंबून राहावे लागत आहे.
      व्यवहारामध्ये आणि मैत्रीपूर्ण सबंधामध्ये या दोन्ही ठिकाणी दर्जाहीन वैद्यकीय उपकरणे देऊन ड्रॅगन विश्वावरील कोरोनाचे विळखा अजून वाढवत आहे. मदतीचा बहाणा करून आपली धुळीस मिळालीली प्रतिमा उंचवण्याची संधि सोडून चीन मजबूरीचा फायदा घेत फसवेगिरी आणि धोकेबाजी करत आहे.  
प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे     
रसायनशास्त्र विभाग
विवेकानंद कॉलेज कोल्हापूर

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Corona Series Part 39 : कोरोना, आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग

Corona Series Part 39       नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोना , आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग जगात असा एक ही देश नसेल जिथे ज्ञानाचा भंडार असणारे भारतीय लोक त्या देशाच्या प्रगतिमध्ये सहभागी नाहीत. कोरोनाच्या लढ्यात तरी हे मागे कशी राहतील. सिरम इंडिया लिमिटेड पुणे स्थित जैव तंत्रज्ञानातील अग्रणी कंपनी आहे यां कंपनीचे वैशिष्ट्य म्हणजे या पूर्वी ही hepatitis, पोलीओ , स्वाइन फ्लू इत्यादि आजारामध्ये लस निर्माण करण्याचे महत्वाचे योगदान आहे. वर्षभरात १.५ अब्ज लसीचे डोस अतिशय माफक दरात तयार करण्याची क्षमता असणारी या कंपनीचे उत्पादन यूरोपियन देशात व संशोधन यूनिट पुणे सारख्या शहरात आहे. भारतामध्ये एक ही नोबेल परितोषिक किवा औषधाचा स्वामित्व हक्क नाही तरीही औषध , लस उत्पादन करण्यात प्रावीण्य , विश्वसनीय नावलौकिक मिळवणारा देश आहे. जावपास ८०% लस आफ्रिका सारख्या देशात पुरवेल जातात. कोरोनाची लस निर्माण करण्यासाठी न्यूयॉर्क मधील codagenic या...

Corona Series Part 56 : कोरोना, आणि ई-शिक्षण

Corona Series Part 56 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. आजचा विषय विस्तृत मांडला आहे.   या विषया बाबतीत आपण आपले मत ब्लॉगवर जरूर कळवावे ही विनंती.     https://ajinkya1030.blogspot.com   कोरोना , आणि ई-शिक्षण मार्च महिन्यापासन कोरोनाचा प्रभाव दिसू लागला शेवटच्या आठवड्यापासून शाळा , कॉलेज लॉकडाउनच्या काळापासून आज पर्यन्त बंद करण्यात आल्या. भितीदायक वातावरणामध्ये १० , १२वी च्या परीक्षा घेण्यात आल्या. शैक्षणिक वर्ष २०१९-२० चे कार्य संपत आले होते परंतु लेखी आणि मौखिक परीक्षा राहिल्या होत्या . आणि आता यूजीसीच्या मार्गदर्शंनानुसार त्या राहूनच जातील. किंवा काही अंशी तात्पुरती योजना राबवून काही ना काही मार्ग काडला जाईल.   नैसर्गिक आपत्ती महापुर , वैश्विक महामारी मधून शैक्षणिक क्षेत्रा समोर नवीन आव्हान उभे राहिले आहे. खाजगी , काही सरकारी शाळा , कॉलेजने देखील तात्पुरती सोय करण्यासाठी ऑनलाइन तास झूम , गूगल क्लासरूम , गूगल डॉक , यू ट्यूब , व्हाट्स अप...

पुन्हा कधीही कोरोना सारख्या महामारीमुळे लेख लिहायची वेळ येऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे आज काय लिहावे आणि काय नको समजेनासे झाले आहे. तरी धाडस करून लिहित आहे. काही चुकले तर समजून घ्यावे ही विनंती.   मार्च महिन्यामध्ये जगात नवीन विषाणू ने धुमाकूळ घातला होता सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शास्त्रज्ञ , संशोधक , मीडिया , नेते , उद्योजक , आणि सामान्य जनता सर्वच नागरिकांना पुढे काय वाहून ठेवले आहे याची कल्पना नव्हती. परिस्थितीचे आकलन होण्याचा आतच लॉकडाउन झाला तेव्हा सुट्टीचा आनंद घेऊया असे समजून काही नागरिक मस्त मजेत होते. हळू हळू परिस्थिती बदलून गंभीर झाली , पण नेमके काय चालू आहे काय करावे आणि काय करू नये याचा अंदाज लागेना. मीडिया मध्ये रोज के भीतीदायक बातमी येऊ लागली कधी विषाणू वर असलेले उपाया येऊ लागले पण शास्त्रीय माहिती सजत नसल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ लागले . अश्या मध्ये रसायनशास्त्राचा विद्यार्थी म्हणून कोरोना विषाणूच्या विरोधात   काही काम करावे असे वाटत होते परंतु संशोधन करण्यासाठी काही मर्यादा होत्या याचे भान होते पण शांत बसून चालणार नाही हे लक्षात आले होते. म्हणून मनातून ठरवले आज या संकटकाळी समजासाठी आप...