Skip to main content

Corona Series Part 37 : कोरोना, आणि लक्षणे


Corona Series Part 37
      नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे.

कोरोना, आणि लक्षणे
कोरोना नवीन विषाणू नसला तरी इतरांपेक्षा त्याचे वेगळेपण समोर दिसत आहे. रोज नवनवीन संशोधन होत बरीच माहिती मिळू लागली आहे. आता पर्यन्त कोरोना म्हणजे सर्दी, ताप, खोखला, श्वास घेणायस अडथळा, अशी काही प्रमुख लक्षणे समोर आली होती. चीन मध्ये कोरोनाचा दुसरा हंगाम चालू झाला तेव्हा कोणतेही लक्षणे न आढळणारा आजार म्हणून नोंद होऊ लागली. या सगळ्यामद्धे आता उपचार करत असताना डॉक्टराना शरीरात होणारे बदल नव्याने आढळून येत आहेत. कोण कोणती नवीन लक्षणे आणि न आढळणारी लक्षणे या बाबत माहिती घेऊया.

जर्नल ऑफ अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या एक शोध निबंधचा आधारघेत Washington post मध्ये माहिती प्रसारित झाली. करोनाच्या रुग्णमध्ये रक्त गोठणारी लक्षणे समोर आली आहेत. रक्त गोठने ही एक नैसर्गिक प्रक्रियाच आहे जेव्हा व्यक्ति जखमी होतो तेव्हा शरीरातील रक्त वाहून जाऊ नये यासाठी शरीतात फायबर आणि प्लेटलेट च्या मदतीने जखमेवर पातळ रक्त-अर्धघन-घन अवस्थेत रूपांतर होऊन गोठले जाते. परंतु बर्‍याच वेळेला बिघाडामुळे  शरीराच्या अंतर्गत फुफुस, किडनी, हृदय, मेंदू अवयवामद्धे रक्त गोठून रक्त प्रवाह अडवला जातो आणि त्यामुळे शरीराची बरीच हानी होते हे सर्व ज्ञात आहे. असेच कोरोनाची बाधा झाल्यानंतर  अंतर्गत अवयवामद्धे रक्त गोठन्याचे प्रकार आढळून आले आहेत. नेदर्लंडमध्ये झालेल्या संशोधांनामध्ये १८४ आयसीयू मधील रुग्णापैकी ३१% आणि चीनमधील १८३ आयसीयू मधील ७१% रुग्णामद्धे रक्त गोठण्याची लक्षणे निदर्शनास आली आहे. यावर उपाय करण्यासाठी रक्त पातळ होणार्‍या औषधाची छोटी व योग्या मात्रा रुग्णांना दिली जात आहे. असे कोरोनाचे बरेचसे पैलू वैज्ञानिकांमार्फत (डॉ) समजू लागले आहेत. परंतु काही रुग्ण मात्र कोनतीही लक्षणे दाखवत नाहीत त्या सायलंट स्प्रेडर संदर्भात जाणून घेऊ.

कोरोना रुग्णांचे त्यांच्या लक्षणांच्या दृष्टिने ३ प्रकारात वर्गीकरण करता येईल १) रुग्ण ज्यांच्या मध्ये तीव्र लक्षणे आढळतात २) रुग्ण ज्यांच्या मध्ये अति सोम्य लक्षणे आढळतात ३) रुग्ण ज्यांच्या मध्ये लक्षणे आढळत नाहीत. डब्ल्यूएचओच्या माहिती नुसार १ आणि २ वर्गामधील लोक कोरोनाचा प्रसार होण्यास प्रामुख्याने करणीभूत राहतात. परंतु जसे संशोधन पुढे जात आहेत तसे लक्षणे न आढळणारे रुग्ण कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात करू शकतात असे लक्षात येऊ लागले आहे. हा प्रसार थांबवन्यासाठी कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त तपासणी करणे हा एकमेव रामबाण उपाय आहे. भारतात चाचणी करण्याची यंत्रणाकशी आहे. सर्व प्रथम परदेशी प्रवासी आणि त्यांचे कुटुंब, कोरोना बाधित रुग्णाचा जवळ संपर्कात असणारे सारे लोक, हॉटस्पॉट भागामधील लक्षणे असणारे लोक, सफाई, डॉ, ईत्यादी लोक, वयोवृद्ध, श्वसनाचे आजार असणारे या सर्वांची १ किवा २ वेळा तपासणी केली जाते. लक्षणे नसणारे लोकांची चाचणी लवकर होत नाही. त्यामुळे कोरोना फोफावण्यासाठी वेळ मिळतो आणि लक्षणे नसणारा न कळत बाधा पसरवतो. डब्ल्यूएचओ आणि आयसीएमआर नूसार सध्या ८०% लक्षणे नसणरे बाधित आढळत आहेत. विविध देशात हे प्रमाण ५-८०% आहे. चीनमध्ये लॉकडाउन कढल्यांनंतर ७८% लक्षण नसणारे लोक तसेच इटली मध्ये ७% लोक कोरोनाने ग्रस्त सापडले. असे असले तरी अजून देखील शास्त्रज्ञांमद्धे या बाबत २ मत प्रवाह आहेत. येणार्‍या काळात यावर एकमत होणे महत्वाचे असून लक्षणे नसताना बाधा पसरवणार्‍याचा बाबतीत काही तरी उपाय केला पाहिजे हा यक्ष प्रश्न शास्त्रज्ञांसमोर आहे. यावर कोणता मार्ग समोर येतो हे पाहाण्यासाठी कोरोना शास्त्रज्ञांसमोर उभा आहे.

प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे     
रसायनशास्त्र विभाग
विवेकानंद कॉलेज कोल्हापूर


Comments

  1. Please give detail about additional symptoms given by CDC and WHO

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Corona Series Part 39 : कोरोना, आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग

Corona Series Part 39       नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणू चा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोना , आणि लस निर्मिती मधील भारतीयांचा सहभाग जगात असा एक ही देश नसेल जिथे ज्ञानाचा भंडार असणारे भारतीय लोक त्या देशाच्या प्रगतिमध्ये सहभागी नाहीत. कोरोनाच्या लढ्यात तरी हे मागे कशी राहतील. सिरम इंडिया लिमिटेड पुणे स्थित जैव तंत्रज्ञानातील अग्रणी कंपनी आहे यां कंपनीचे वैशिष्ट्य म्हणजे या पूर्वी ही hepatitis, पोलीओ , स्वाइन फ्लू इत्यादि आजारामध्ये लस निर्माण करण्याचे महत्वाचे योगदान आहे. वर्षभरात १.५ अब्ज लसीचे डोस अतिशय माफक दरात तयार करण्याची क्षमता असणारी या कंपनीचे उत्पादन यूरोपियन देशात व संशोधन यूनिट पुणे सारख्या शहरात आहे. भारतामध्ये एक ही नोबेल परितोषिक किवा औषधाचा स्वामित्व हक्क नाही तरीही औषध , लस उत्पादन करण्यात प्रावीण्य , विश्वसनीय नावलौकिक मिळवणारा देश आहे. जावपास ८०% लस आफ्रिका सारख्या देशात पुरवेल जातात. कोरोनाची लस निर्माण करण्यासाठी न्यूयॉर्क मधील codagenic या...

Corona Series Part 56 : कोरोना, आणि ई-शिक्षण

Corona Series Part 56 नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुरर्भाव लक्षात घेऊन Social Media च्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. आजचा विषय विस्तृत मांडला आहे.   या विषया बाबतीत आपण आपले मत ब्लॉगवर जरूर कळवावे ही विनंती.     https://ajinkya1030.blogspot.com   कोरोना , आणि ई-शिक्षण मार्च महिन्यापासन कोरोनाचा प्रभाव दिसू लागला शेवटच्या आठवड्यापासून शाळा , कॉलेज लॉकडाउनच्या काळापासून आज पर्यन्त बंद करण्यात आल्या. भितीदायक वातावरणामध्ये १० , १२वी च्या परीक्षा घेण्यात आल्या. शैक्षणिक वर्ष २०१९-२० चे कार्य संपत आले होते परंतु लेखी आणि मौखिक परीक्षा राहिल्या होत्या . आणि आता यूजीसीच्या मार्गदर्शंनानुसार त्या राहूनच जातील. किंवा काही अंशी तात्पुरती योजना राबवून काही ना काही मार्ग काडला जाईल.   नैसर्गिक आपत्ती महापुर , वैश्विक महामारी मधून शैक्षणिक क्षेत्रा समोर नवीन आव्हान उभे राहिले आहे. खाजगी , काही सरकारी शाळा , कॉलेजने देखील तात्पुरती सोय करण्यासाठी ऑनलाइन तास झूम , गूगल क्लासरूम , गूगल डॉक , यू ट्यूब , व्हाट्स अप...

पुन्हा कधीही कोरोना सारख्या महामारीमुळे लेख लिहायची वेळ येऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना

नमस्कार मी अजिंक्य पत्रावळे आज काय लिहावे आणि काय नको समजेनासे झाले आहे. तरी धाडस करून लिहित आहे. काही चुकले तर समजून घ्यावे ही विनंती.   मार्च महिन्यामध्ये जगात नवीन विषाणू ने धुमाकूळ घातला होता सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शास्त्रज्ञ , संशोधक , मीडिया , नेते , उद्योजक , आणि सामान्य जनता सर्वच नागरिकांना पुढे काय वाहून ठेवले आहे याची कल्पना नव्हती. परिस्थितीचे आकलन होण्याचा आतच लॉकडाउन झाला तेव्हा सुट्टीचा आनंद घेऊया असे समजून काही नागरिक मस्त मजेत होते. हळू हळू परिस्थिती बदलून गंभीर झाली , पण नेमके काय चालू आहे काय करावे आणि काय करू नये याचा अंदाज लागेना. मीडिया मध्ये रोज के भीतीदायक बातमी येऊ लागली कधी विषाणू वर असलेले उपाया येऊ लागले पण शास्त्रीय माहिती सजत नसल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ लागले . अश्या मध्ये रसायनशास्त्राचा विद्यार्थी म्हणून कोरोना विषाणूच्या विरोधात   काही काम करावे असे वाटत होते परंतु संशोधन करण्यासाठी काही मर्यादा होत्या याचे भान होते पण शांत बसून चालणार नाही हे लक्षात आले होते. म्हणून मनातून ठरवले आज या संकटकाळी समजासाठी आप...