Skip to main content

कोरोना, आणि लक्षणे भाग २

कोरोना, आणि लक्षणे भाग २
कोरोनाची नवीन लक्षणे या विषयावर बर्‍यापैकी लोकल वृतपत्रात सविस्तर माहिती प्रसिद्ध झाली. वृतपत्राचा आवक मोठा असतो त्यामुळे पुन्हा पुन्हा तोच विषय सोशल मीडियावर पुन्हा चर्चा करणे योग्य नाही म्हणून फेसबूक, व्हाट्स अपवर माहिती प्रसिद्ध केली नाही फक्त ब्लॉग वर उपलब्ध असेल.
सध्या जगात आरोग्य विषयक मार्गदर्श करण्यासाठी डब्ल्यूएचओ सारखी संघटना आहे. परंतु या वैश्विक महामारीमध्ये संघटना आरोपाच्या ट्टप्यामध्ये आली आहे. USA मधील 17जुलै 1946 साली स्थापन झालेली सीडीसी संघटना आरोग्याचा बाबतीत डब्ल्यूएचओच्या तोडीचीच अशी मानली जाते. सीडीसीची 1.1 बिलियन डॉलर ईतकी मोठी अर्थ व्यवस्था आहे.  ही संघटना देखील आरोग्याच्या बाबतीत महत्वाचे योगदान देत आली आहे. आज कोरोनाची बाधा असणारे रुग्ण अमेरिका मध्ये जास्त आहे. त्यामुळे आपसूकच सीडीसीला संशोधन करण्यास आणि लक्षणे शोधून काडण्यास जास्त माहिती उपलब्ध होत आहे. सीडीसी काही नवीन लक्षणे आढळून आली आहेत. आता सीडीसी आणि डब्ल्यूएचओ या दोन्हीही संस्थांच्या कोरोना वरील लक्षणामद्धे फरक आढळून येत आहे. आपण दोन्ही संस्थांनी सगीतलेल्या लक्षणाचा आढावा घेऊ.
२६ एप्रिल २०२० रोजी सीडीसी ने कोरोनाच्या संदर्भात ६ नवीन लक्षणे सांगण्यात आली. १) थंडी वाजणे २) थंडी वाजून शरीर कुडकुडणे ३) स्न्यायूमध्ये वेदना ४) डोकेदुखी ५) घसा खव खवणे ६) चव आणि गंध न येणे ७) ताप येणे ८) कोरोडा खोखला ९) श्वसनास अडथळा अशी ३ लक्षणे होतीच. आपणास माहीत असेल २ ते १४ दिवसामध्ये हा विषाणू शरी, रात राहून लक्षणे दाखवायला लागतो. सामान्या सर्दी, नाक गळणे, शिंका येत राहणे ही कोरोनाची लक्षणे नाहीत. बहुतौंश देशात जो व्यक्ति लक्षेने दाकवत आहेत असया सर्वांची चाचणी केली जात आहे परंतु खूप सारे असेन नागरिक आहेत जी कोणतीही लक्षणे दाखावत नाहीत त्यामुळे या नागरिकांची तपासणी केली जात नाही किवा तपासणीसाठी उशीर होत असल्याने कोरोनाचा प्रसार होत राहतो. जे आर्थिक दृष्ट्या सक्षम आहेत ते उलाढाली करून खाजगी लॅब मध्ये तपासणी करून घेत आहे परंतु गरज नसताना तपासणी करण योग्या नाही कारण तपासणी किट मर्यादित आहेत.
डब्ल्यूएचओनी दिलेली लक्षणे आणि सीडीसी ची लक्षणे या मध्ये आता फरक आसल्यामुळे नेमकी कोणती लक्षणे ग्राह्य धरायची. डब्ल्यूएचओ नुसार १) ताप २) कोरोडा खोखला ३) थकवा ३) श्वसनास अडथळा ४) घसा खव खवणे ५) नाक गळणे ६) स्न्यायूमध्ये वेदना ही लक्षणे आहेत. भारतता डब्ल्यूएचओ ने सगीतलेली लक्षणे ग्राह्य धरून तपासणी केली जात आहे. फेब्रुवारीमध्ये डब्ल्यूएचओने चीन मध्ये लक्षणांवर अभ्यास केला या मधून १) ताप ८८% २) कोरोडा खोखला ६८% ३) थकवा ३८% ३) श्वसनास अडथळा १९% ४) स्न्यायूमध्ये वेदना १५% ५) घसा खव खवणे १४% ६) निराशा उलटी ५% ८) नाक गळणे ५% ९) डायरिया ३% १०) थंडी वाजणे ११%, खोखल्यातू  रक्त पडणे आणि डोळेना त्रास १%  ईत्यादी लक्षणाचे प्रामान आढळले आहे. जानेवारी फेब्रुवारी मध्ये चीन मध्ये चव आणि गंध न येणे हे लक्षणं सापडले नव्हते तसेच शरीरामध्ये रक्त गोठणायचे लक्षणं देखील तुरळक होते.
दोन्ही संस्थानी सगीतलेल्या लक्षणा मध्ये थोडा फार फरक जरी असला तरी हा एक संशोधनाचा भाग आहे. आपण घाबरून नजाता वरील पैकी कोणतेही लक्षणं आढळले तरीआपण आपल्या डॉक्टररानशी संपर्क करा. डॉक्टरा ना भेटण्या पूर्वी quarantine रहा किवा social distancing करा. बरीच लक्षने ही सामान्या आहेत त्यामुळेच घाबरून जाऊ नका. आपले डॉक्टर आपल्याला योग्य मार्गदर्शन करतील.

प्रा डॉ अजिंक्य अजित पत्रावळे     
रसायनशास्त्र विभाग
विवेकानंद कॉलेज कोल्हापूर
https://ajinkya1030.blogspot.com

Comments

Post a Comment